विशेष प्रतिनिधी
मुंबई : Anjali Damania भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना वाचवण्याचा मोठा प्रयत्न झाला. खासदार सुनील तटकरे यांनी चौकशी होऊ नये म्हणून आटोकात प्रयत्न केले ते ढाल म्हणून त्यांच्या समोर उभे होते, पण मी डीजींना पत्र पाठवले होते की सर्वांची चौकशी झालीच पाहिजे, त्यामुळेच रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.Anjali Damania
अंजली दमानिया म्हणाल्या की, रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत कशा पोहचल्या या गोष्टी बाहेर आल्या पाहिजे. यासाठी रुपाली चाकणकर यांची वकील न घेता चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.Anjali Damania
चौकशीतून सर्व समोर येईल
बजरंग सोनवणे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर असो की आणखी कोणी असो ते समोर येईल. चाकणकर तर महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या पण महिलावर अत्याचार झाला अशा तक्रारी 14 महिलांनी दिल्या आहेत. या तक्रारीच्या आधारे सरकारने एसआयटी स्थापन करत चौकशी केली आहे. खरातची पत्नी फरार आहे, यामध्ये त्याचे कुटुंब सहभागी होते का हे सुद्धा चौकशीमधून समोर येईल.
रुपाली चाकणकर नाशिकमध्ये
राज्यभरात खळबळ माजवून देणाऱ्या अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणात आज एक महत्त्वपूर्ण वळण मिळत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आज नाशिकमधील विशेष तपास पथकासमोर चौकशीसाठी हजर झाल्या. चौकशीला सामोरे जाताना रूपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्या म्हणाल्या, खरात प्रकरणी जो काही तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील ते देण्यासाठी मी आलेली आहे. या तपासात पूर्णपणे माझे सहकार्य राहील. त्यामुळे यात जे काही प्रश्न असतील त्या सगळ्यांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनात आहेत. जेव्हा हा तपास पूर्ण होईल, त्या तपासातूनच तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App