मोठी बातमी : रशियाचा स्पाय सॅटेलाइट अवकाशात झाला अनियंत्रित, लवकरच पृथ्वीवर आदळण्याची शक्यता, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

Russian spy satellite went out of control in space, soon to hit the earth, scientists warn

Russian spy satellite : जगभरातील शास्त्रज्ञ अंतराळात होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. या संबंधात वेळोवेळी उपग्रह आणि अवकाशयानही अवकाशात पाठवले जातात. काही काळापूर्वी रशियाने स्पेस रॉकेटच्या साहाय्याने एक गुप्तचर लष्करी उपग्रह अवकाशात पाठवला होता, तो यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आल्याचा दावाही रशियाने केला होता. पण आता बातमी येत आहे की, हा लष्करी उपग्रह खराब झाल्याने अनियंत्रित झाला असून आता तो कधीही पृथ्वीवर आदळू शकतो. Russian spy satellite went out of control in space, soon to hit the earth, scientists warn


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरातील शास्त्रज्ञ अंतराळात होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. या संबंधात वेळोवेळी उपग्रह आणि अवकाशयानही अवकाशात पाठवले जातात. काही काळापूर्वी रशियाने स्पेस रॉकेटच्या साहाय्याने एक गुप्तचर लष्करी उपग्रह अवकाशात पाठवला होता, तो यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आल्याचा दावाही रशियाने केला होता. पण आता बातमी येत आहे की, हा लष्करी उपग्रह खराब झाल्याने अनियंत्रित झाला असून आता तो कधीही पृथ्वीवर आदळू शकतो.

20 टन वजनाचा रशियन उपग्रह निकामी होऊन पृथ्वीवर आदळण्याची शक्यता लक्षात घेता जगभरातील शास्त्रज्ञ चिंतित झाले आहेत. हा लष्करी उपग्रह पृथ्वीवर पडला किंवा आदळला तर मोठी हानी होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

रशियन उपग्रह अवकाशात अनियंत्रित

20 टन वजनाचा रशियन लष्करी गुप्तचर उपग्रह निकामी झाल्यानंतर अनियंत्रित झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आला परंतु रॉकेटच्या वरच्या टप्प्यावरील बूस्टर पर्सेई उड्डाणादरम्यान अयशस्वी झाला. याच कारणामुळे हा उपग्रह त्याच्या योग्य कक्षेत पोहोचू शकला नाही आणि आता हा उपग्रह पुन्हा पृथ्वीवर पडणार आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा अनियंत्रित उपग्रह आणि त्यात बसवलेले बूस्टर सुमारे 20 टन आहेत आणि येत्या काही आठवड्यांत पृथ्वीवर पडू शकतात. मात्र, तज्ज्ञांच्या या दाव्यावर रशियन लष्कराच्या हायकमांडने अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

अवकाशात अनियंत्रित झालेला हा रशियन उपग्रह पृथ्वीवर कुठेही पडू शकतो, मात्र तो प्रशांत महासागरात पडण्याची शक्यता अधिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तो पॅसिफिक महासागरात पडला तर चांगलेच आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे पृथ्वीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता कमी होईल.

Russian spy satellite went out of control in space, soon to hit the earth, scientists warn

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण