Income Tax Return : GST कौन्सिलच्या बैठकीत कमी रिटर्न फाइलिंग आणि पोर्टलमधील समस्यांमुळे ITR भरण्याची अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२१ असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे, ती पुढे वाढवली जाणार नाही. Income Tax Return last date for filing ITR will not increase, the Finance Ministry said – file it by 12 o’clock in any case
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : GST कौन्सिलच्या बैठकीत कमी रिटर्न फाइलिंग आणि पोर्टलमधील समस्यांमुळे ITR भरण्याची अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२१ असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे, ती पुढे वाढवली जाणार नाही.
महसूल सचिव तरुण बजाज यांनी सरकारच्या वतीने ही महत्त्वाची माहिती दिली आहे. आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. बजाज म्हणाले की, आयकर विवरणपत्र भरण्याचे काम सुरळीत सुरू आहे. शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 5.62 कोटी आयकर रिटर्न भरले आहेत. ते म्हणाले की, शेवटच्या तारखेपर्यंत 20 लाखांहून अधिक रिटर्न भरले गेले आहेत. याशिवाय यावर्षी 60 लाख अतिरिक्त रिटर्न भरले आहेत.
नववर्षाचे सेलिब्रेशन करण्याऐवजी, वर नमूद केलेल्या कारणांमुळे ज्यांना आयटीआर भरण्याची शेवटची तारीख वाढण्याची अपेक्षा आहे, त्यांनी प्रथम आयकर रिटर्न भरणे सुरू केले पाहिजे. कारण जर ITR भरला नाही तर तुम्हाला नवीन वर्षात समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि त्या बदल्यात तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला या त्रासांपासून दूर राहायचे असेल तर रात्री 12 वाजण्यापूर्वी तुमचा रिटर्न नक्कीच दाखल करा.
Income Tax Return last date for filing ITR will not increase, the Finance Ministry said – file it by 12 o’clock in any case
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App