वृत्तसंस्था
इस्लामाबाद : भारतातून धमकी आल्यामुळेच न्यूझीलंड क्रिकेट संघाने दौरा रद्द केला आहे, अशा उलट्या बोंबा पाकिस्तानच्या प्रसारण मंत्र्याने ठोकल्या आहेत. After Kiwis call off Pakistan tour amid security threat, Pak minister Fawad Chaudhry alleges India’s involvement
क्रिकेट संघाला धमकीचा आलेला ई मेल हा भारतातून आल्याचा दावा पाकिस्तानचे प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी केला आहे. हा ई मेल हा भारतातून सिंगापूर मार्गे आल्याचे व्हीपीएन यंत्रणेच्या माध्यमातून केल्याचा दावा करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात न्यूझीलंडचा क्रिकेट संघ पाकिस्तानात आला होता. त्यानंतर धमकी मिळाल्यामुळे दौरा अर्धवट सोडून बुधवारी संघ मायदेशी परतला. धमकी मिळाल्याच्या वृत्ताला न्यूझीलंडने दुजोरा दिला आहे. मात्र, त्याचा तपशील खुला करण्यास नकार दिला आहे.
पाकिस्तानच्या या दाव्यावर भारतीय परराष्ट्र खात्याने प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. भारत आणि पाकिस्तान दोघेही अण्वस्त्रधारी राष्ट्रे असून एकमेकावर कोणत्या ना कोणत्या कारणावरून आरोप करत आले आहेत.
दरम्यान, वेस्टइंडिजचा क्रिकेट संघ डिसेंबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहे. त्या संघाला सुद्धा असाच धमकीचा ई मेल आला होता. परंतु तो खोटा असल्याचे फवाद चौधरी यांनी स्पष्ट केले. एकंदरीत न्यूझीलंड संघाने दौरा अर्धवट सोडल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. या घटनेमुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App