Know About Scholar Maulana Kaleem Siddiqui Arrested by UP ATS in Religion Conversion Case

वाचा.. कोण आहेत मौलाना कलीम सिद्दिकी? यूपीतील बडे प्रस्थ, अभिनेत्री सना खानचा निकाह आणि सरसंघचालकांशी भेटीमुळे चर्चेत… आता धर्मांतरप्रकरणी अटक

Know About Scholar Maulana Kaleem Siddiqui : इस्लामिक विद्वान मौलाना कलीम सिद्दीकींना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. फुलाट येथील रहिवासी मौलाना कलीम सिद्दीकी हे इस्लामिक विद्वानांमध्ये मोठे नाव आहे. टीव्ही अभिनेत्री सना खानच्या निकाहमुळे ते चर्चेत आले होते. मौलाना सिद्दीकी यांनी 7 सप्टेंबर रोजी मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आयोजित केलेल्या ‘राष्ट्र प्रथम और राष्ट्र सर्वोपरि’ कार्यक्रमालाही हजेरी लावली होती. एडीजी प्रशांत कुमार यांनी गुरुवारी लखनऊमध्ये सांगितले की, मौलाना कलीम सिद्दीकी यांचा बेकायदा धर्मांतर प्रकरणांमध्ये सहभाग आढळला आहे. Know About Scholar Maulana Kaleem Siddiqui Arrested by UP ATS in Religion Conversion Case


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : इस्लामिक विद्वान मौलाना कलीम सिद्दीकींना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. फुलाट येथील रहिवासी मौलाना कलीम सिद्दीकी हे इस्लामिक विद्वानांमध्ये मोठे नाव आहे. टीव्ही अभिनेत्री सना खानच्या निकाहमुळे ते चर्चेत आले होते. मौलाना सिद्दीकी यांनी 7 सप्टेंबर रोजी मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आयोजित केलेल्या ‘राष्ट्र प्रथम और राष्ट्र सर्वोपरि’ कार्यक्रमालाही हजेरी लावली होती. एडीजी प्रशांत कुमार यांनी गुरुवारी लखनऊमध्ये सांगितले की, मौलाना कलीम सिद्दीकी यांचा बेकायदा धर्मांतर प्रकरणांमध्ये सहभाग आढळला आहे.

धर्मांतराचे मोठे रॅकेट

धर्मांतराच्या प्रकरणात कलीम सिद्दीकी यांना मेरठ येथून अटक करण्यात आली आहे. त्यांचे वर्तन संशयास्पद असल्याचे दिसून आले. 64 वर्षीय मौलाना कलीम सिद्दीकी मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता मेरठमधील एका कार्यक्रमासाठी आले होते. यूपी पोलिसांचे म्हणणे आहे की, मौलाना कलीम सिद्दीकी देशातील सर्वात मोठे धर्मांतर रॅकेट चालवतात. ते बिगर मुस्लिमांना धमकावून, भीती दाखवून धर्मांतर करतात असा आरोप आहे. यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणावर निधी दिला जात आहे. या बेकायदेशीर पैशाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

अनेक ठिकाणी मदरसे

मौलाना कलीम सिद्दीकी हे पश्चिम उत्तर प्रदेशातील एक मोठे नाव आहे. मौलाना कलीम सिद्दीकी हे ग्लोबल पीस सेंटरचे अध्यक्ष आहेत आणि जमीयत-ए-वलीउल्लाहचे अध्यक्षही आहेत. ते मुझफ्फरनगरमधील फुलटचे रहिवासी आहेत. मौलाना कलीम सिद्दीकी यांनी 15 वर्षांपूर्वी दिल्लीच्या शाहीन बागेत राहायला सुरुवात केली, सध्या त्यांचे कुटुंब तेथे राहते. फुलटव्यतिरिक्त अनेक ठिकाणी त्यांच्या नावावर मदरसे चालवले जातात. त्यांना कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी देशासह परदेशातून आमंत्रित केले जाते.

उमर गौतम केसमध्ये समोर आले नाव

उमर गौतम प्रकरणाच्या तपासादरम्यान मौलाना कलीम सिद्दीकीचे नाव पुढे आले. जूनमध्ये यूपी एटीएसने धर्मांतरणाच्या आरोपावरून मोहम्मद उमर गौतम आणि मुफ्ती काझी जहांगीर कासमी या दोन मौलवींना अटक केली होती. पोलिसांनी सांगितले की, हे लोक कथितरीत्या धर्मांतराचे रॅकेट चालवत होते. उत्तर प्रदेशचे एडीजी प्रशांत कुमार यांनी स्वतः माहिती दिली होती की, गौतमने धर्म बदलून इस्लाम स्वीकारला होता व तो काही वर्षांपासून गरिब, महिला, दिव्यांगांचे धर्मांतरण घडवून आणत होता.

Know About Scholar Maulana Kaleem Siddiqui Arrested by UP ATS in Religion Conversion Case

महत्त्वाच्या बातम्या