West Bengal CM Mamata Banerjee Election Rally In Bhavanipur, Criticizes PM Modi and Amit Shah

भवानीपूरच्या सभेत ममतांनी सांगितले एकेका मताचे महत्त्व, म्हणाल्या- मत नक्की द्या, पराभव झाल्यास मुख्यमंत्रिपदी राहू शकणार नाही!

Mamata Banerjee Election Rally In Bhavanipur : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान निवडणूक सभेला संबोधित करताना मतदारांना विजयाचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, एकेक मत महत्त्वाचे आहे. नंदीग्राममध्ये षडयंत्राने पराभूत झाले. पण मुख्यमंत्री भवानीपूरचेच असणार होते. ते नशिबात लिहिले होते. एक मतदेखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमचे मत नक्की टाका. तुम्ही मतदान केले नाही तर मी मुख्यमंत्री राहू शकणार नाही, दुसरा मुख्यमंत्री होईल. त्यामुळे नक्की मतदान करा आणि जिंकवा. कारण ही एक मोठी लढाई आहे. देशाला तालिबान होऊ देणार नाही.” West Bengal CM Mamata Banerjee Election Rally In Bhavanipur, Criticizes PM Modi and Amit Shah


वृत्तसंस्था

भवानीपूर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान निवडणूक सभेला संबोधित करताना मतदारांना विजयाचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, एकेक मत महत्त्वाचे आहे. नंदीग्राममध्ये षडयंत्राने पराभूत झाले. पण मुख्यमंत्री भवानीपूरचेच असणार होते. ते नशिबात लिहिले होते. एक मतदेखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमचे मत नक्की टाका. तुम्ही मतदान केले नाही तर मी मुख्यमंत्री राहू शकणार नाही, दुसरा मुख्यमंत्री होईल. त्यामुळे नक्की मतदान करा आणि जिंकवा. कारण ही एक मोठी लढाई आहे. देशाला तालिबान होऊ देणार नाही.”

इक्बालपूरमध्ये निवडणूक सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, तुमचे एक मतदेखील जरूरी आहे, टीएमसीकडे बहुमत असले तरी मुख्यमंत्री राहण्यासाठी त्यांना जिंकणे आवश्यक आहे. लढा प्रचंड आहे. जर तुमचे एक मत मिळाले नाही तर मी मुख्यमंत्री राहू शकणार नाही. तथापि, गतवेळी ममता बॅनर्जी नंदीग्राममधून पराभूत झाल्या होत्या. आता त्यांना मुख्यमंत्रिपदी राहण्यासाठी जिंकणे आवश्यक आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, एनआरसीविरोधात लढा दिला जाईल. आम्ही घाबरत नाही. भवानीपूर हे मिनी हिंदुस्थान आहे. येथे सर्व प्रकारचे लोक राहतात. बंगाली आणि गैर बंगाली हे सर्व तिथे राहतात. आम्ही हे होऊ देणार नाही. भारत भारतच राहील. देशाला तालिबान होऊ देणार नाही. देशाचे विभाजन होऊ देणार नाही. बंगालचे तुकडे होऊ देणार नाही.

त्या म्हणाल्या की, नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, आम्ही तुम्हाला तालिबानसारखा भारत बनवू देणार नाही. भारत अखंड राहील. गांधीजी, नेताजी, विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, गुरु नानकजी, गौतम बुद्ध, जैन यांचा देश कायम राहील. देशात एकत्र राहा. आम्ही कोणालाही भारताचे विभाजन करू देणार नाही.

West Bengal CM Mamata Banerjee Election Rally In Bhavanipur, Criticizes PM Modi and Amit Shah

महत्त्वाच्या बातम्या