अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात 10 वर्षांत अदानी ग्रुप करणार 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, अंबानींना देणार टक्कर

Adani Group to invest Dollar 20 billion in renewable energy in 10 years

Renewable Energy : अदानी समूह पुढील 10 वर्षांत अक्षय ऊर्जा उत्पादन आणि स्पेअर पार्ट्स निर्मितीमध्ये 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. जगातील सर्वात स्वस्त ग्रीन इलेक्ट्रॉनची निर्मिती यातून होणार आहे. अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांनी मंगळवारी त्यांच्या समूहाचा हरित ऊर्जेचा अजेंडा स्पष्ट करताना हे सांगितले. Adani Group to invest Dollar 20 billion in renewable energy in 10 years


वृत्तसंस्था

नवी दिल्ली: अदानी समूह पुढील 10 वर्षांत अक्षय ऊर्जा उत्पादन आणि स्पेअर पार्ट्स निर्मितीमध्ये 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. जगातील सर्वात स्वस्त ग्रीन इलेक्ट्रॉनची निर्मिती यातून होणार आहे. अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांनी मंगळवारी त्यांच्या समूहाचा हरित ऊर्जेचा अजेंडा स्पष्ट करताना हे सांगितले. ते म्हणाले की, पुढील चार वर्षांत ग्रुपने आपली अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता तिप्पट करणे, ग्रीन हायड्रोजन जनरेशन क्षेत्रात प्रवेश करणे, अक्षय्य ऊर्जेवर सर्व डेटा सेंटर चालवणे, 2025 पर्यंत आपल्या बंदरांमधून कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि 2025 पर्यंत हरित तंत्रज्ञानामध्ये भांडवलाचा 75 टक्के भाग खर्च करण्याची योजना आखली आहे.

अदानी समूहाच्या प्रमुखांनी जेपी मॉर्गन इंडिया इन्व्हेस्टर समिटमध्ये आपल्या भाषणादरम्यान ही माहिती दिली. ते म्हणाले की, अक्षय्य ऊर्जा निर्मिती, सुट्या भागांचे उत्पादन, प्रसारण आणि वितरण या क्षेत्रांमध्ये 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाईल.

सर्वात स्वस्त ग्रीन इलेक्ट्रॉन बनवण्याच्या मार्गावर

उद्योगपती म्हणाले की, अदानी समूहाची “एकात्मिक मूल्य साखळी, आमचा आकार आणि अनुभव जगातील सर्वात स्वस्त ग्रीन इलेक्ट्रॉन उत्पादक बनण्याच्या मार्गावर आहेत.” याआधी अलीकडेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनीदेखील तीन वर्षांत स्वच्छ ऊर्जा आणि हायड्रोजन इंधनात 75,000 कोटी रुपयांची ($ 10 अब्ज) गुंतवणूक जाहीर केली आहे. अंबानी यांनी या महिन्यात सांगितले की, एका दशकात प्रति किलोग्राम $ 1 च्या किंमतीत अक्षय ऊर्जेपासून हायड्रोजन तयार केले जाऊ शकेल. हायड्रोजनमध्ये कार्बन उत्सर्जन नाही आणि ते उद्योग आणि ऑटोमोबाईलमध्ये इंधन म्हणून वापरले जाऊ शकते.

Adani Group to invest Dollar 20 billion in renewable energy in 10 years

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात