‘हाऊस ऑफ सिक्रेट्स’ बुरारी डेथ केसवर आधारित ही नेटफ्लिक्स सिरीज सर्वांचे लक्ष का वेधून घेतीये?

विशेष प्रतिनिधी

दिल्ली : 2018 मध्ये दिल्ली येथे घडलेल्या बुरारी डेथ केसवर आधारित नेटफ्लिक्सवर ‘हाउस ऑफ सीक्रेट्स’ नावाची एक सीरिज नुकताच प्रदर्शित झाली आहे. मास सुसाइड किंवा मास मर्डर या प्रश्नांची उत्तरे देणारी ही सिरीज नेटफ्लिक्स इंडियाने डॉक्युमेंटच्या स्वरुपात बनवली आहे.

Why is this netflix series ‘House of Secrets’ based on Burari Death Case catching everyone’s attention

काय झालं होतं बुरारी येथे?

दिल्ली मधील बुरारी परिसरातील भाटिया कुटुंबातील अकरा जणांनी एकाचवेळी आत्महत्या केली होती. घरच्या पहिल्या मजल्यावर सर्वांनी एकाच दिवशी फाशी घेऊन आपले जीवन संपवले होते. घरातील सर्वात वयस्कर आजी पासून शाळेत जाणारी मुले यांचाही यामध्ये सहभाग होता. भाटिया कुटूंबियांच्या इतर नातेवाईकांनी मात्र हा एक जाणूनबुजून, अतिशय प्लॅनिंग करून केलेला मर्डर आहे असे आरोप केले होते. तर पोलिसांना गुन्हेगार पकडणे अशक्य आहे म्हणून पोलिस याला आत्महत्याचे नाव देत आहेत. असा आरोप देखील नातेवाईकांनी केला होता.

घटनास्थळी मिळालेले पुरावे :

हे प्रकरण इतके मोठे झाले होते की त्याच दिवशी घटनास्थळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कमिश्नर ऑफ दिल्ली अशा सर्व लोकांनी भेट दिली होती. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून बरेच पुरावे एकत्र केले होते. पण मुख्य पुरावा होता तो म्हणजे घरातील देवघरा जवळ मिळालेल्या वह्या. या वह्यांमध्ये या घटनेचे गूढ लपलेले होते. घटनास्थळी एक छोटे होमकुंड देखील आढळून आले होते. त्यावरून असा अंदाज लावण्यात आला होता की, ज्या दिवशी ती घटना घडली त्याच दिवशी तिथे होम करण्यात आला होता.


नुकत्याच नेटफ्लिक्स रिलीज झालेला स्क्विड गेम या वेब सिरीजला मिळत आहे प्रचंड लोकप्रियता, नेमके काय आहे या वेब सिरीज मध्ये?


पॅटर्न 11 काय आहे?

घराच्या भिंतींवर अकरा पाइप्स आढळून आल्या होत्या. पैकी सात पाइपचे ओपनिंग खालच्या दिशेला होते. तर चार पाईपचे ओपनिंग सरळ दिशेला होते. मृत व्यक्तींमध्ये सात स्त्रिया होत्या आणि चार पुरुष होते. या पाईप भिंतीमध्ये ज्या रचनेमध्ये फीट करण्यात आलेल्या होत्या त्याच रचनेमध्ये घरातील लोकांनी आत्महत्या केली होती. ‘पॅटर्न 11’ हा विषय मीडियाने उचलून धरला होता. कारण घराच्या समोरच्या गेट वरही 11 लोखंडी रॉडची खिडकी होती. घरा मध्ये एकूण 11 खिडक्या होत्या. आणि मृत व्यक्तींची संख्या देखील 11 होती.  11 वह्या सापडल्या होत्या.

वरील पुरावे लक्षात घेता असे दिसते की, अंधश्रद्धेपोटी या सर्वांनी आत्महत्या केली होती. पण येथे आणखी एक थेअरी आहे.

ललित भाटियाबद्दल आजवर माहिती नसलेल्या गोष्टी :

इतर टीपीकल इंडियन फॅमिली मध्ये जसे एक पुरुष घरातील सर्व निर्णय घेतो आणि बाकी सगळे लोक त्या व्यक्तीचे ऐकतात. अशी भाटिया फॅमिली होती. या घरातील प्रमुख व्यक्तीचे नाव होते ललीत भाटिया.

ललितचा 1988 मध्ये अपघात झाला होता. त्यातून तो मरता मरता वाचला होता. पुढे तो कामानिमित्त सर्व फॅमिली दिल्लीला शिफ्ट झाली. दिल्लीमध्ये ललित ज्या ठिकाणी काम करायचा तिथे पैशांमध्ये वरचढ झाली, या कारनावरून काही लोकांनी ललितला बंद खोलीमध्ये जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचे त्याच्या मनावर इतके खोल पडसाद उमटले होते की, ललितने आपला आवाज गमावला.

आवाज गमावला की डीप ट्रॉमामुळे त्याने स्वतः बोलण्याचे ठरवले नव्हते ही एक लक्षात घेण्यासारखी गोष्टी आहे. ही गोष्ट त्यावेळी मीडियामध्ये कोणीही चर्चिली नाही. पण नेटफ्लिक्स इंडियाने बनवलेल्या सिरीजमध्ये ह्या न टाळता येणाऱ्या गोष्टीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. मनोविकार तज्ज्ञांच्या मते जर तुम्हाला खूप मोठ्या काळासाठी डीप ट्रॉमा सहन करावा लागला असेल आणि त्यावर तुम्ही कोणताही इलाज केला नसेल तर तो ट्रॉमा सायकॉटिक सिच्युएशनमध्ये कन्व्हर्ट होतो. ही परिस्थिती म्हणजे, तुम्ही आयुष्यात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींविषयी रॅशनल विचार करत नाही. एव्हाना तुमचा मेंदू रॅशनल विचार करण्यासाठी असमर्थ ठरतो.

घटनास्थळी सापडलेल्या वह्यांमध्ये काय होते ?

घटनास्थळावरून फॉरेन्सिक टीमने एकूण अकरा वह्या जप्त केलेल्या होत्या. या सर्व वह्यांमध्ये कोणीतरी ‘एक अदृश्य व्यक्ती’ बोलतोय असा मजकूर आढळून आला होता. तर कोण होती ही व्यक्ती? घरातील सर्वात वयस्कर आजी म्हणजे नारायणी देवी. त्यांचे वय 80 होते. त्यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. तर घरातल्या लोकांचा असा समज झाला होता की, त्यांचा आत्मा घरातील सर्वात मोठा मुलगा म्हणजे ललित याच्या शरीरामध्ये येतो आणि त्यांच्या आशीर्वादाने घरामध्ये सर्वकाही चांगले होत आहे.

नेटफ्लिक्स इंडियाने बनवलेल्या सिरीज मध्ये कुटुंबियांचे जवळचे लोकही म्हणतात की मागील काही वर्षामध्ये त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारत होती. तर त्या वह्यांमध्ये लिहिलेल्या मजकुरावरून असे कळून येते की, नारायनी देवी यांच्या दिवंगत पतीचा आत्माला त्यांचा मोठा मुलगा ललितच्या शरीरात प्रवेश करतो. आणि तेच कुटुंबातील सर्व गोष्टींसाठी सल्ले देतात आणि त्यांची काळजी घेतात असा भाटिया कुटुंबीयांचा समज होता. घटनास्थळी मिळालेल्या वह्यांमधील मजकुरावरून हे स्पष्ट होते. आणि त्याच सापडलेल्या वहीमधील मजकुरावरून असे स्पष्ट होते की, कुटुंबाने वड पूजा करण्याचे ठरवले होते. वडाच्या झाडाच्या पारंब्या प्रमाणे लटकने.

ठरवून केलेली आत्महत्या की चुकीने झालेली आत्महत्या??

वह्यांमध्ये सापडलेल्या मजकुरावरून असे स्पष्ट होते की, ही वड पूजा झाल्यानंतर एकमेकांना त्यातून मुक्त करण्यासाठी एकमेकांना मदत केली पाहिजे. घटनास्थळी जेव्हा पोलीस पोहोचले होते तेव्हा प्रत्येक बॉडीचे हात मागे बांधलेले होते. डोळ्यांवर पट्टी होती. तोंडावर पट्टी होती. तर वही मध्ये लिहिल्याप्रमाणे मजकुराप्रमाणे एकमेकांना यातून मुक्त करण्यासाठी मदत केली पाहिजे. म्हणजे या लोकांचा मरणाचा अजिबात उद्देश नव्हता. फक्त ही पूजा करणे हा उद्देश होता. त्यामुळे हा अकरा जणांचा झालेला मृत्यू ही एक चुकीने झालेली आत्महत्या होती. असा निष्कर्ष पाेलिसांनी काढला.

या घटनेनंतर मिडीयामध्ये बऱयाच उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. आता नेटफ्लिक्स इंडियाने यावर एक डॉक्युमेंट्री बनवून सर्व सीक्रेट्स जगासमोर मांडले आहेत. हाऊस ऑफ सिक्रेट्स ही सिरीज सर्वांनी पाहावी अशी सिरीज आहे. कमजोर मनाच्या लोकांनी पाहण्याआधी विचार करावा. कारण मन विचलित करणारी दृश्ये ह्या सीरिज मध्ये आहेत.

Why is this netflix series ‘House of Secrets’ based on Burari Death Case catching everyone’s attention

 

महत्त्वाच्या बातम्या