नुकत्याच नेटफ्लिक्स रिलीज झालेला स्क्विड गेम या वेब सिरीजला मिळत आहे प्रचंड लोकप्रियता, नेमके काय आहे या वेब सिरीज मध्ये?


विशेष प्रतिनिधी

मुंबई: नेटफिक्सवर नुकतीच एक जबरदस्त वेबसीरिज रिलीज झाली आहे, जिचे नाव आहे स्क्विड गेम. या हटके वेब सिरीजला डोक्यावर घेतले जात आहे. ही मूळ दक्षिण कोरियन वेबसिरीज आहे जिला हिंदीमध्ये डब करण्यात आले आहे. या सीरिजमध्ये एकूण नऊ एपिसोड आहेत आणि प्रत्येक एपिसोड अर्धा ते एक तासाचा आहे.

What is so special in this Korean webseries ‘Squid Game’

काय आहे कथा?

या सीरिजमधील मुख्य पात्र ही खूप कठीण काळातून जात आहेत. या सर्वांवर खूप मोठे कर्ज आहे. तरी या सर्वांचे आयुष्य बदलण्याकरिता त्यांना एका गेम खेळण्यासाठी आमंत्रित केले जाते. हा गेम जो कोणी जिंकेल त्याला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याईतके पैसे मिळतील. पण हा जो कोणी हरेल, तो मृत्यूला प्राप्त होईल. तरीही गरिबी दूर करण्यासाठी या सिरीज मधील सीरिजमधील काही मुख्य पात्र हा गेम खेळण्याचे आमंत्रण स्विकार करतात.


Netflix : आता मित्रांना पासवर्ड शेअर करणे होईल कठीण, व्हेरिकेशन होणार अनिवार्य


का बघावी ही सिरीज

या सीरिजमध्ये प्रत्येक दृश्य अतिशय उत्तमरित्या दाखवले गेले आहे. या सीरिजशी संबंधित तुम्ही इतरहीही थ्रिलर किंवा सस्पेन्स सिरीज बघितल्या असतील. परंतु ही सिरीज त्यामधील सगळ्यात हटके आहे. ह्या मागील आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, यातील प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिलेला आहे. या सिरीजचे चित्रीकरण/सिनेमॅटोग्राफी खूप वेगळ्या लेव्हलला जाऊन केली गेली आहे. यातील प्रत्येक चांगले किंवा वाईट दृश्य हे तुमच्यावर दीर्घकाळ प्रभाव टाकेल. सर्व एपिसोड मध्ये प्रत्येक दृश्याला दिलेले उत्तम पार्श्वसंगीत हेसुद्धा या सिरीजमधील प्लस पॉइंट आहे.

ही सीरिज खूप मोठी असून यामध्ये नऊ एपिसोड आहेत त्यामुळे ही सिरीज पूर्ण बघण्यासाठी तुम्हाला खूप वेळ द्यावा लागेल. बघण्याआधी आम्ही अशी मॉर्निंग देतो की, ही सिरीज वीक माइंडेड लोकांसाठी नाही. यात प्रचंड प्रमाणात हिंसा आहे. जी बघितल्यावर कदाचित तुम्हाला डोळे बंद करावे लागतील. पण जर तुम्ही थ्रिलर, सस्पेन्स, ट्विस्ट आणि ॲक्शन या कॅटेगरीचे चाहते असाल, तर नक्कीच ही सिरीज बघण्यासारखी आहे. यातील गेम हा बिग बॉस टाइप आहे पण हा खेळ बाहेरच्या जगासाठी नाही. तसेच यातील खलनायक कोण आहे हे तुम्हाला सिरीज मध्येच पहावे लागेल.

What is so special in this Korean webseries ‘Squid Game’

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”