शिवरायांना भवानी तलवार देतानाची अलंकार महापुजा तुळजापुरात शारदीय नवरात्र महोत्सव थाटात सुरु

प्रतिनिधी

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र महोत्सव सुरू आहे. आज सातव्या माळेदिवशी पाच महाअलंकार पुजा पैकी भवानी तलवार अलंकार महापुजा मांडली गेली.Bhavani sword to Shivaraya ; Mahapuja at Tulajaapur

सकाळी देवीचा अभिषेक व महाआरती करून नवैद्य दाखवला. आई तुळजाभवानी माता ही स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत आहे . हिंदू धर्मरक्षणासाठी तुळजाभवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार भेट दिल्याचे सांगितले जाते.

त्यामुळे आज तुळजाभवानीच्या सिंहगाभाऱ्यात भवानी मातेला छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्पण केलेले सुवर्ण अलंकार घातले जातात. समोर किल्ला व छ्त्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती ठेऊन भवानी तलवार भेट देत असल्याची पुजा मांडली आहे.

– सकाळी देवीचा अभिषेक व महाआरती करून नवैद्य

– शिवरायांना भवानी तलवार देतानाची महापुजा

– हिंदू धर्मरक्षणासाठी तुळजाभवानीकडून तलवार

– महाराजांनी देवीला दिलेले सुवर्णअलंकार घातले

-आज सातव्या माळेदिवशी पाच महाअलंकार पुजा

Bhavani sword to Shivaraya ; Mahapuja at Tulajaapur