विशेष प्रतिनिधी
मुंबई : जालियनवाला बाग हत्याकांडास कारणीभूत असणाऱ्या मायकेल द्वार यांना लंडनमध्ये जाऊन मारणारे क्रांतिकारक सरदार उधमसिंग यांच्या जीवनावर आधारित सुजीत सरकार एक सिनेमा बनवत आहेत. या सिनेमामध्ये विकी कौशल सरदार उधमसिंग यांचे कॅरेक्टर प्ले करत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा सिनेमा अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Vicky kaushal’s much awaited movie sardar udham singh’s trailer is out
जालियानवाला बाग हत्याकांडमध्ये 1000 हून अधिक लोक मृत पावले होते. त्यावेळी पंजाबचे गव्हर्नर मायकेल द्वार होते. आणि तेच या हत्याकांडास कारणीभूत होते. या घटनेचा बदला म्हणून सरदार उधम सिंग यांनी लंडनमध्ये जाऊन बदला घेतला होता. दिग्दर्शक सुजित सरकार यांच्या या सिनेमामध्ये या सर्व घटनांवर बारकाईने प्रकाश टाकण्यात आला आहे. सरदार उधम सिंग लंडनमध्ये खोटी आयडेंटिटी घेऊन जाण्यापासून ते त्याचे मर्डर प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन हा सर्व प्रवास या सिनेमामध्ये दाखवला जाणार आहे. असे या सिनेमाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरवरून दिसून येते.
BOLLYWOOD : ‘थलाईवी’ कंगना रणौतचा मोठा निर्णय ; अभिनेत्रीनं बदललं आपलं नाव…
उधमसिंग यांच्या कॅरेक्टरमध्ये विकी कौशल अगदी परफेक्ट दिसत आहे. तर आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यामुळे त्यांने उधम सिंग यांचे कॅरॅक्टर्स जिवंत केले आहे असे या ट्रेलरवरून दिसून येते. त्यामुळे प्रेक्षक देखील या सिनेमाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. १६ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होईल.
पिकू, ऑक्टोबर या सारख्या उत्कृष्ट सिनेमांच्या दिग्दर्शकाने हा सिनेमा बनवला आहे त्यामुळे ह्या सिनेमकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App