Amarinder Singh : कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेस सोडणार, पण भाजपमध्ये आताच प्रवेश नाही, काँग्रेस घसरणीला लागल्याची टीका

Captain Amarinder Singh will leave Congress, has also taken a clear stand on BJP

काँग्रेस हायकमांडवर नाराज असलेले पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग लवकरच पक्षाचा राजीनामा देणार आहेत. ते म्हणाले की, मी अपमान सहन करणार नाही. अमरिंदर सिंग यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी ट्विट करून त्यांचे वक्तव्य जारी केले आहे. Captain Amarinder Singh will leave Congress, has also taken a clear stand on BJP


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस हायकमांडवर नाराज असलेले पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग लवकरच पक्षाचा राजीनामा देणार आहेत. ते म्हणाले की, मी अपमान सहन करणार नाही. अमरिंदर सिंग यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी ट्विट करून त्यांचे वक्तव्य जारी केले आहे.

ते म्हणाले की, अमरिंदर सिंग यांनी हे स्पष्ट केले आहे की ते भाजपमध्ये सामील होणार नाहीत, परंतु त्यांचा यापुढे काँग्रेसमध्ये राहण्याचा कोणताही हेतू नाही. वरिष्ठ नेत्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे आणि त्यांचे म्हणणे ऐकले जात नाही. वरिष्ठ नेते वळचणीला पडल्यामुळे काँग्रेसची घसरण सुरू आहे. पुढील भूमिकेबाबत, कॅप्टन म्हणाले की, ते अजूनही विचार करत आहेत.”

खरं तर 18 सप्टेंबर रोजी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या वादानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर अमरिंदर सिंह 28 सप्टेंबर रोजी पहिल्यांदा दिल्लीत आले आणि बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तेव्हापासून अमरिंदर सिंग भाजपमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, बैठकीनंतर त्यांनी ट्विट केले की, त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गृहमंत्र्यांशी चर्चा केली.

अमरिंदर सिंग यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांची भेट घेतली. याबाबत कॅप्टन म्हणाले की, पंजाबमधील सुरक्षा परिस्थितीबाबत चर्चा झाली आहे. सीमावर्ती राज्य असल्याने अमरिंदर सिंग सातत्याने स्थिरतेबद्दल वक्तव्य करत आले आहेत.

अमरिंदर सिंग यांनी एनडीटीव्ही या खासगी वाहिनीशी संभाषण करताना म्हटले की, “सध्या मी काँग्रेसमध्ये आहे, पण जास्त काळ तेथे राहणार नाही. मी स्पष्ट केले आहे की, मी 52 वर्षांपासून राजकारणात आहे आणि बराच काळ काँग्रेसमध्ये आहे. जर 50 वर्षांनंतर माझ्या विश्वासार्हतेवर शंका आली, विश्वास नसेल, तर उरले काय? अशा स्थितीत मी मुख्यमंत्रिपद सोडले.”

Captain Amarinder Singh will leave Congress, has also taken a clear stand on BJP

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात