सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि प्रशासनाला योग्य ते निर्देश देतील असेही अजित पवार यांनी सांगितले.Ajit Pawar said that the state government will provide relief to the farmers who are facing difficulties due to heavy rains
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील असून जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेकडून नुकसानाबद्दलची निश्चित माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करु, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि मी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी पीकविम्याचे पैसे लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी विमा कंपन्यांशी चर्चा सुरु आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.
राज्यसरकार संपुर्ण माहिती गोळा करत आहे. आकडे प्राप्त झाल्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेईल. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे निकष पाहून मदत करण्याची आमची भूमिका आहे. सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि प्रशासनाला योग्य ते निर्देश देतील असेही अजित पवार यांनी सांगितले.
केंद्रसरकारकडे मदतीची मागणी करताना शेतकऱ्यांच्या नुकसानाचा अंदाज घेऊन मागणी केली जाते. मात्र किती मदत द्यायची हा सर्वस्वी केंद्राचा निर्णय आहे. काही काही राज्यांना केंद्राने न मागता स्वतःहून हजारो कोटींचे पॅकेज दिले होते. केंद्रसरकार हे संपुर्ण देशाचे आहे. त्यामुळे कोणत्याही राज्यासोबत दुजाभाव न करता मदत दिली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App