कोल्हापुरी लई भारी – कस्तुरीने केले माउ़ट मनस्लू शिखर सर


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कस्तुरी सावेकर ही करवीर हायकर्स कोल्हापूरची गिर्यारोहक आहे. तिने नुकतेच माउंट मनस्लू शिखर सर केले आहे. जगातील १४ अष्टहजारी शिखरांपैकी आठव्या क्रमांकावर असलेल्या या शिखरावर कस्तुरीने चढाई करून नेत्रदीपक कामगिरी केली आहे. हे शिखर ८ हजार १६३ मीटर इतके उंच आहे. या चढाईमुळे ती ही कामगिरी करणारी कोल्हापुरातील सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे.

Proud moment for Kolhapurkars! Kolhapur’s Kasturi Savekar scales Mount Manaslu

मे महिन्यामध्ये कस्तुरीने माउंट एवरेस्ट मोहीम केली होती. परंतु खराब हवामानामुळे ती थांबवावी लागली होती. कस्तुरीचे वडील मेकॅनिक असून आई गृहिणी आहे. कस्तुरीला गिर्यारोहणासाठी तिच्या पालकांनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.


Nagpur Education Policy : NEPला RSS किंवा ‘नागपूर शिक्षण धोरण’ म्हटले तर आनंदच : मुख्यमंत्री बोम्मई


माउंट मनस्लू साठी तिने २५ सप्टेंबरला चढाई सुरू केली व २७ सप्टेंबरला कॅंम्प तीनवर पोचली. मनस्लू शिखरावर २८ सप्टेंबरच्या सकाळी सव्वा सातच्या सुमारास तिने देशाचा तिरंगा व करवीरचा भगवा ध्वज अभिमानाने फडकवला. कस्तुरीने सिद्ध केले आहे की जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात. तिच्या या यशामुळे सह्याद्रीतील अनेक तरुणांना गिर्यारोहण करण्याची प्रेरणा मिळेल.

Proud moment for Kolhapurkars! Kolhapur’s Kasturi Savekar scales Mount Manaslu

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात