Fadanvis meets Shah: देवेंद्र फडणवीस दिल्लीत-अमित शाह यांची भेट ; गृहमंत्र्यानादेखील मराठवाड्याची चिंता


  • गोवा निवडणुकीत भाजप पहिल्यांदाच पर्रिकरांशिवाय विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. अशावेळी निवडणूक प्रभारी म्हणून फडणवीसांवर देखील अधिक जबाबदारी असणार आहे.
  • फडणवीस यांचा निवडणूक व्यवस्थापनाचा मोठा अनुभव गोव्यातील भाजपसाठी फायदेशीर ठरु शकतो .

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत आहेत त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मराठवाड्यातील अतिवृष्टी संदर्भात चर्चा केली. अमित शाह यांनीदेखील मराठवाड्यातील शेतीच्या नुकसानीचा आढावा घेत चिंता व्यक्त केली.महाराष्ट्रातील खास करून मराठवाड्यातील पाऊस आणि पूरस्थिती याचीही तपशीलवार माहितीही अमित शाह यांना देण्यात आली.तसेच गोवा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात अमित शाह यांच्याशी त्यांनी चर्चा केली. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मंत्री मायकेल लोबोही उपस्थित होते.Fadanvis meets Shah: Devendra Fadnavis in Delhi- meets Amit Shah; Home Minister also worried about Marathwada

 

गोव्याचे निवडणूक प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 20 सप्टेंबरला त्यांनी गोव्याचा दौरा केला होता. तसंच 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर ते लक्ष केंद्रीत करत आहेत.

भाजपसाठी व्यूहरचना कशी करायची ते फडणवीस ठरवत आहेत. वरिष्ठ नेते पुढील 3-4 महिन्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एकूण परिस्थितीचा आढावा घेतील. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात भाजप नेत्यांची टीम ही मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कॅबिनेट मंत्री आणि पक्षातील आमदारांशी चर्चा करणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांची ओळख ही अभ्यासू नेते अशी आहे. त्यामुळेच त्यांच्यावर आता गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे.

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात मोठा राजकीय पेच पेचप्रसंग निर्माण झाला होता. मात्र, भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी अनेक डावपेच आखून गोव्यातील आपली सत्ता कायम ठेवली होती. तेव्हापासून गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ही डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडेच आहे.

Fadanvis meets Shah: Devendra Fadnavis in Delhi- meets Amit Shah; Home Minister also worried about Marathwada

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय