विशेष प्रतिनिधी
मुंबई : सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी या दोघींची प्रमुख भूमिका असणारा डबल XL हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. आज या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. भारतामध्ये मुलींनी जाड असणं म्हणजे काहीतरी गुन्हा केल्यासारखं ट्रीट केलं जातं. फॅट शेमिंग, बॉडी शेमिंग करणारे हजारो लोकांचा हा जणू छंद झालेला असतो. याच कॉन्सेप्टवर आधारित हा सिनेमा आहे.
The trailer of the movie Double XL starring Huma Khurshi and Sonakshi Sinha has been released
बाहुबली फेम अॅक्ट्रेस अनुष्का शेट्टी हिची प्रमुख भूमिका असणारा साइज झिरो हा सिनेमा साऊथमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अतिशय उत्तम कमाई केली होती. या सिनेमाचा विषय देखील फॅट शेमिंग हाच होता. आता बॉलीवूडमध्ये हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा या दोन अभिनेत्रींना घेऊन डबल XL हा सिनेमा बनवण्यात आलाय.
स्टार किड्स कडूनही मुव्हीज काढून घेतल्या जातात? सोनाक्षी सिन्हाने नेपोटीझमवर व्यक्त केले आपले विचार
हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा या दोघींना खऱ्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा त्यांच्या वजनावरून ट्रोल करण्यात आले होते.
बॉडी शेमिंग, फॅट शेमिंग या बाबतीत लोकांना विचार करण्यासाठी नवा दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न करणे हाच उद्देश या चित्रपटाचा आहे. भारतामध्ये नाहीतर संपूर्ण जगामध्ये आजही स्त्रिया कशा दिसता, त्यांचे वजन किती आहे यावरून त्यांना जज केले जाते. हे साफ चुकीचे आहे. या वर आधारित हा या सिनेमा असणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App