शाहरुख खान बड्डे स्पेशल! पाहूया, शाहरुख खान बद्दलच्या माहीत नसलेल्या काही गोष्टी


विशेष प्रतिनिधी

मुबंई : बॉलीवूडचा बादशहा, किंग ऑफ रोमान्स म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान याचा आज वाढदिवस आह. आज शाहरुखचा 56 वा वाढदिवस आहे. शाहरुख खानने दिवाना या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. ‍भारतातील सर्वोच्च पद्मश्री अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला शाहरुख खान फक्त अभिनेता नाही. तर तो एक सक्सेस फुल बिझनेसमन देखिल आहे. यावर्षी त्याचा वाढदिवस खूप जास्त स्पेशल असणार आहे कारण ड्रग प्रकरणात अडकलेल्या त्याचा मुलगा तब्बल 26 दिवसानंतर जामीनावर घरी परतला आहे. तर जाणून घेऊया शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल काही माहीत नसलेल्या गोष्टी.

Shah Rukh Khan Birthday Special! Let’s see some things we don’t know about Shah Rukh Khan

1. मंगळावर शाहरुखची आहे जमीन : शाहरुख खानची एक ऑस्ट्रेलियन फॅन दरवर्षी त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यासाठी मंगळ ग्रहावर जागा विकत घेते. लुनार रिपब्लिक सोसायटीकडून तीने शाहरुखसाठी चंद्रावर याआधी देखील जागा विकत घेतली आहे. द सी ऑफ ट्रँक्विलीटी इथे तिने शाहरुखसाठी जागा घेतली आहे.

2. आपला अवॉर्ड त्याने सलमान खानला दिला होता: शाहरुख खान आणि सलमान खान यांची दोस्ती तर जगजाहीर आहे. कधी दोघांचे भांडण होते तर कधी ते दोघे एकमेकांचे कौतुक करताना थकत नाहीत. 1988 साली झी सिनेचा बेस्ट अॅक्टर अवॉर्ड शाहरुख खानला मिळाला होता. पण शाहरुखने तो अवॉर्ड अभिनेता सलमान खान याला दिला होता. त्यांने सलमानला स्टेजवर बोलवून तो अवॉर्ड घेण्यासाठी भाग पाडले होते.


शाहरुख खानची बायजूची जहिरात पुन्हा सुरू, आर्यनच्या ड्रग्ज प्रकरणामुळे एड्युटेक कंपनीने केली होती बंद


3. 555 नंबरचे वेड : शाहरुख खानला 555 या नंबरचे ऑब्सेशन आहे. त्याच्या दोन गाड्यांचा नंबर 555 असा आहे. त्यांच्या प्रत्येक एम्प्लॉईच्या फोनवर हा नंबर प्रिंट केलेला असतोच असतो.

4. डॉक्टर शाहरुख खान : शाहरुख हा बॉलीवूडमधील सर्वात हुशार आणि जाणकार अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने आजवर तीन विद्यापीठाच्या डॉक्टरेट पदव्या मिळाल्या आहेत. तो एक सक्सेसफुल बिझनेसमन असण्यासोबतच एक उत्तम अभिनेता देखील आहे. त्याचप्रमाणे समाजोपयोगी अनेक कामे त्याने केलेली आहेत. त्याला स्कॉटलंडमधील एडिनबर्ग विद्यापीठातून डॉक्टरेट ही पदवी मिळाली आहे. त्यामुळे शाहरुखचे औपचारिक नाव डॉ शाहरुख खान असे आहे.

5. नाइटहुड हा सर्वोच्च मलेशियन अवॉर्ड : मलेशियात दिला जाणारा सर्वात मानाचा अवॉर्ड म्हणजे नाइटहूड हा आहे. शाहरुख खानला हा अवॉर्ड मिळाला आहे. हा अवॉर्ड मिळणारा तो एकमेव भारतीय कलाकार आहे.

6. जगातील दुसरा श्रीमंत अभिनेता : आप की अदालत या शोमध्ये शाहरुख खानने सांगितले होते की तो मागील 15 ते 20 वर्षांपासून कोणत्याही सिनेमासाठी मानधन आकारत नाही. तो एन्डोर्समेंट आणि आपल्या बिझनेसमधून पैसे कमावतो. तर शाहरुख खान हा जगातील दुसरा सर्वात श्रीमंत स्टार आहे. टॉम क्रूझ, टॉम हँक, क्लिंट ईस्टवूड आणि अॅडम सँडलर यांच्यापेक्षाही तो श्रीमंत अभिनेता म्हणून ओळखला जातो. वेल्थ एक्स मॅग्झीनने केलेल्या सर्वेक्षणानुसार शाहरुख खानची संपत्ती 600 मिलियन डॉलर इतकी आहे.

7. स्मोकिंग व्यसन : इतक्या मोठ्या सुपरस्टारला स्मोकींगचे अॅडिक्शन आहे. बऱ्याच वेळा सार्वजनिक ठिकाणी तो स्मोकिंग करताना दिसून आला आहे. मी दिवसाला 100 सिगरेटदेखील ओढू शकतो असे त्यांने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

8. बुर्ज खलिफाने शाहरुखच्या बड्डेसाठी दिल्या होत्या शुभेच्छा : 2020 साली शाहरुख त्याच्या वाढदिवसा दिवशी आपल्या कुटुंबियांसोबत दुबईमध्ये होता. दुबई मधील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असणारी आणि शहरातील सर्वात मोठी इमारत बुर्ज खलीफाने एक व्हिडिओ द्वारे शाहरुखला शुभेच्छा दिल्या होत्या. बुर्ज खलीफाने शुभेच्छा दिल्या असा तो एकमेव भारतीय कलाकार आहे.

https://www.instagram.com/p/CHGe-brnKpB/?utm_source=ig_web_copy_link

मूळचा दिल्लीचा असणारा शाहरुख खान एक मध्यमवर्गीय कुटूंबामध्ये जन्मला होता. स्वत:चे नशीब स्वतः घडवणारे, स्वतःच्या कर्तृत्वाने मोठे होणारे लोक कोणत्याही कारणासाठी आणि कधीच थांबत नाहीत. शाहरुख हे त्यापैकीच एक नाव आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शाहरुख खान.

Shah Rukh Khan Birthday Special! Let’s see some things we don’t know about Shah Rukh Khan

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात