विशेष प्रतिनिधी
मुबंई : अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा हे दोघे एकमेकांना जवळपास 11 वर्षांपासून डेट करत होते. अखेर त्यांनी 15 नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो इंटरनेटवर अतिशय वेगाने व्हायरल होतात दिसून येत आहेत.
Rajkumar Rao and Patralekha ties knot, wedding photos goes viral
आपल्या लग्नाची बातमी अभिनेता राजकुमार राव यांने आपल्या सोशल मिडिया हँडलवर दिली आहे. तो आपल्या सोशल मीडिया हाडावरील पोस्टमध्ये लिहितो, ‘अखेर 11 वर्षांनंतर आम्ही दोघांनी एकमेकांसोबत लग्न केले. ही 11 वर्ष प्रेम आणि रोमान्सने भरलेली होती. मैत्रीपूर्ण आणि अतिशय मजेमध्ये ही 11 वर्ष गेली आहेत. ती माझे सर्वस्व आहे. आज मी तिच्यासोबत लग्न करतोय. ती माझी सोलमेट आहे. बेस्ट फ्रेंड आहे. माझी फॅमिली आहे. आणि आज मला सर्वात जास्त आनंद या गोष्टीचा होतोय की मी पत्रलेखाचा नवरा झालोय.’ अतिशय गोड आणि प्रेमळ शब्दांमध्ये त्यांने आपल्या लग्नाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.
क्रिती सेनन आणि राजकुमार राव यांचा हम दो हमारे दो चित्रपटाचा टीझर रिलीज मजेशीर ढंगात चांगली संकल्पना मांडण्याचा प्रयत्न
पत्रलेखानेही आपल्या सोशल मिडिया हँडलवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला. मी माझ्या सर्वस्वासोबत लग्न केलेलं आहे. जो माझा बेस्ट फ्रेंड आहे. पार्टनर इन प्राईम आहे. फॅमिली आहे. सोलमेट आहे. माझा बेस्ट फ्रेंड आहे. 11 वर्षांच्या नात्यानंतर आम्ही एकमेकांसोबत लग्न करत आहोत. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. असे तिने लिहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App