विशेष प्रतिनिधी
बंगलोर : कन्नड सुपरस्टार पुनित कुमार यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना प्रचंड दु ख झाले होते. त्यांचे दु:ख इतके मोठे होते की, त्यांनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना देखील पुनीत कुमार यांच्या मृत्यूला जबाबदार धरले होते.
Puneet Rajkumar will be honored with Karnataka Ratna Award
आपल्या मरणानंतर आपले डोळे दान करण्यात यावेत, अशी पुनीत यांची इच्छा होती. त्यांच्या डोळ्यांमुळे चार लोकांना दृष्टी मिळाली होती. ह्या गुणी आणि प्रसिध्द अभिनेत्याला मरणोत्तर कर्नाटक रत्न अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज यानी नुकतीच ही बातमी जाहीर केली आहे. राज्य सरकारतर्फे पुनीत कुमार यांना कर्नाटक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे.
पुनीत राजकुमारच्या फॅमिली डॉक्टरांना का दिले जातेय पोलीस संरक्षण?
पुनीत कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला होता. अरुण नावाच्या एका त्यांच्या फॅन मार्फत त्यांच्या मृत्यूबद्दल इन्व्हेस्टिगेशन करण्यात यावी असे पीटिशन सुरू करण्यात आले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार पुनीत कुमार यांच्या मृत्यूची चौकशी झालीच पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App