कारच्या दरवाजाला धडकून तरुणाचा मृत्यू पुण्यातील सिव्हिटीव्हीतून अधिक स्पष्ट


पुण्यातील सिव्हिटीव्हीतून अधिक स्पष्ट

विशेष प्रतिनिधी

पुणे : रॉंग साईडला पार्क असलेल्या कारचा दरवाजा अचानक उघडल्याने दुचाकीस्वाराची धडक दरवाजाला बसली. त्यात त्याचा या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला.
राम बाळासाहेब बांगल ( वय २४ ) याचा अपघातात मृत्यू झाला..राम बांगल हा चुलत भाऊ किशोर राजन बांगल यांच्या सोबत बुलेटवरून जात होता.

त्याच दरम्यान कारमध्ये बसलेल्या व्यक्तीने अचानक कारचा दरवाजा उघडल्याने राम बागल हा दरवाजाला धडकून खाली पडला. समोरून आलेल्या ट्रकच्या चाका खाली येऊन रामचा मृत्यू झाला आहे.

या अपघातात दिघी पोलिसांनी किशोर राजेंद्र बांगल, सुरज जगन्नाथ घुले, सुमित कालिदास पराडे आणि एका अज्ञात आयसर ट्रक चालकाविरोधात दिघी पोलिसांत गुन्हा दाखल केला.

– कारच्या दरवाजाला धडकून पुण्यात तरुणाचा मृत्यू
– राम बाळासाहेब बांगल ( वय २४ ) याचा दुर्देवी मृत्यू
– बुलेटवरून जात असताना अपघात
– कारचा दरवाजा अचानक उघडल्याने बसली धडक
– दिघी पोलिसांत गुन्हा दाखल

car door open suddenly; The young man died after being hit

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था