‘जयंती’ हा मिलिंद शिंदे यांचा चित्रपट लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला


विशेष प्रतिनिधी

मुबंई : सुप्रसिध्द अभिनेते मिलिंद शिंदे यांचा नवीन सिनेमा लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘जयंती’ असे या सिनेमाचे नाव आहे. चित्रपटगृहे सुरू करण्यात आली आहेत, शुटिंग सुरू झाले आहे, कोरोनाचा ज्वर बऱ्यापैकी उतरला आहे तेव्हा अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत येऊन थांबले आहेत.

Much awaited, Milind Shinde starrer movie ‘Jayanti’ will release soon

बॉलीवूड पाठोपाठ आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील अनेक चित्रपटांच्या घोषणा केल्या जात आहेत. त्यापैकीच एक सिनेमा म्हणजे ‘जयंती’ हा होय. हा बहुचर्चित सिनेमा लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाची खूप चर्चा आहे. हा चित्रपट 26 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा सोशल मिडीयावर करण्यात आली आहे.

शैलेश नरवाडे लिखित आणि दिग्दर्शित जयंती हा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे. आर्टिकल 15, मुल्क, थप्पड, नारबाची वाडी, देऊळ यासारख्या दर्जेदार चित्रपटांना पाश्र्वसंगीत देणार्या मंगेश धाकडे यांनी जयंती या सिनेमाला पार्श्वसंगीत दिले आहे. भारतीय संगीत क्षेत्रात ज्यांचं नाव मानाने घेतले जाते, असे गायक जावेद अली यांनी या चित्रपटातील दोन गीतांना आपला आवाज दिला आहे. सुप्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूर यांनी या चित्रपटातील गाणी लिहिली आहेत.


‘पावनखिंड’चा थरार लवकरच रसिकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार


राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘ख्वाडा’ ज्यांनी संकलित केला आहे त्या रोहन पाटील यांनी जयंत या चित्रपटाची संकलनाची धुरा सांभाळली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांची रंगभूषेचे काम केलेले संतोष गिलबिले यांनी या चित्रपटामध्ये रंगभूषेचे काम केले आहे.

या चित्रपटाच्या सेटवर मिलिंद शिंदे यांचा मोठा अपघात होता होता टळला होता. चित्रपटा मधील सीन शूट करण्याच्या आधी मिलिंद शिंदे आपल्या भूमिकेमध्ये इतके मग्न झाले होते की समोर क्रेनचा शूट सीन शूट केला जातोय हे त्यांच्या लक्षात आले नाही. हा अपघात थोडक्यात होता होता टळला होता.

Much awaited, Milind Shinde starrer movie ‘Jayanti’ will release soon

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण