विशेष प्रतिनिधी
मुंबई : 9 डिसेंबर रोजी कॅटरिना कैफ आणि विकी कौशल लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाच्या फोटोनी इंटरनेटवर अक्षरशः वादळ निर्माण केले होते. तर लग्नानंतरचा त्यांचा पहिलाच सण म्हणजे ख्रिसमस होय.
Merry Christmas: Vicky kaushal and Katrina Kaif celebrates christmas together
विकी सध्या इंदोरमध्ये आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. ह्या चित्रपटाचे शेड्यूल 20 दिवसांचे होते. तर ख्रिसमसनिमित्त तो खास कॅटरिना साठी ख्रिसमस साजरा करायला आला आहे. ख्रिसमस दिवशी या दोघांनी आपल्या नव्या घरी आपल्या काही जवळच्या मित्रमैत्रिणींना लंच देखील दिले. आपल्या मित्र मैत्रिणींसोबत त्यांनी ख्रिसमस साजरा केला.
मेरी ख्रिसमस : विजय सेतुपती आणि कॅटरिना कैफ दिसणार श्रीराम राघवन यांच्या ‘मेरी ख्रिसमस’ ह्या चित्रपटात
ख्रिसमस दिवशी या दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे. आणि आपल्या चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
कॅटरिना कैफ ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. या चित्रपटामध्ये ती साउथ सुपरस्टार विजय सेतुपती याच्यासोबत अॅक्टिंग करताना दिसेल. तर या चित्रपटाचे डिरेक्शन श्रीराम राघवन करणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App