विशेष प्रतिनिधी
मुंबई: क्रिती सेनन आणि राजकुमार राव हे बऱ्याच वर्षांनी चित्रपटामध्ये एकत्र आले आहेत. या दोघांच्या हम दो हमारे दो ह्या नवीन चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. क्रीतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचा टिझर पोस्ट केला होता. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमामध्ये परेश रावल आणि रत्ना पाठक शहा यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत.
Kriti Sanon and Rajkumar Rao starring ‘Hum Do Hamare Do’ Teaser released on Wednesday
Kriti and Rajkumar to adopt parents in this film
या चित्रपटामध्ये पालकांना दत्तक घेण्याची संकल्पना मांडली आहे. टीजर खूपच मजेशीर आहे आणि त्यावरून प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. परेश रावल यांची एंट्री टीझरमध्ये फार उत्तमरित्या दाखवली आहे. विशेष म्हणजे स्त्री, लुकाछुपी, बाला आणि मिमी या चित्रपट निर्मात्यांचा (Maddock Films) हा चित्रपट आहे. “अब हमारा हिरो क्या करेगा?” असा प्रश्न टिझरमधे विचारण्यात आला आहे.
सलाम बॉम्बे सिनेमाच्या दिग्दर्शिका मीरा नायर यांचा थक्क करणारा हॉलीवूड प्रवास
क्रीती सेनन हिने यांनी याआधी मिमी हा चित्रपट केला व त्याला चांगले यशही मिळाले. २०१७ नंतर क्रीती आणि राजकुमार चित्रपटामध्ये एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटानंतर क्रिती बच्चन पांडे, भेडीया आणि आदी पुरुष या बिग बजेट चित्रपटांमध्ये झळकणार आहे. अभिनेता राजकुमार राव याचे बधाई दो या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाले आहे. सध्या मोनिका ओ माय डार्लिंग आणि हिट-द फर्स्ट केस या चित्रपटासाठी तो चित्रीकरण करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App