सलाम बॉम्बे सिनेमाच्या दिग्दर्शिका मीरा नायर यांचा थक्क करणारा हॉलीवूड प्रवास


एक चित्रपट फक्त एक कथा किंवा 2-3 तासांचा मनोरंजनाचा भाग अजिबात नसतो. आपल्या आयुष्यात घडलेल्या, न घडलेल्या बऱ्याच संवेदनांना एकमेकांशी जोडणारा एक प्रयत्न म्हणजे सिनेमा असतो.

बॉलिवूडमध्ये प्रामुख्याने मसाला चित्रपट बनवले जातात. प्रेक्षकही हे सिनेमे आवडीने पाहतात. तसेच सामाजिक मुद्द्यांवर देखील भारतात बरेच चित्रपट बनवले जातात. सामाजिक विषयांवर चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकांच्या यादीत सत्यजित रे हे नाव सर्वात वर आहे. सत्यजित रे यांचा हाच वारसा मीरा नायर यांनी उत्तमरित्या चालविला आहे. मीरा नायर या बॉलिवूड आणि प्रामुख्याने हॉलीवूडमधील अशा दिग्दर्शकांपैकी एक आहेत ज्यांचे चित्रपट हे जास्त मसालेदार नसून वेगळ्या धाटणीचे असतात. साहित्य आणि अभिनयाची आवड असलेल्या मीरा नायर यांच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊ.

Salaam bombay fame director mira nair’s astonishing hollywood journey

मीरा नायर यांचा जन्म आणि शिक्षण :

प्रसिद्ध निर्माती, दिग्दर्शक आणि लेखिका मीरा नायर यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९५७ मध्ये ओडिसा येथे झाला. १९८२ पासून त्या चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. कॉन्व्हेंट शाळेत शिकत असताना त्यांना इंग्लिश साहित्याची आवड निर्माण झाली. त्यांनी मिरांडा हाउस दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये सोशिओलॉजीचा अभ्यास केला. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी त्यांना केम्ब्रिज युनिव्हर्सिटीकडून फुल स्कॉलरशिप ऑफर करण्यात आली होती. तिथेच त्यांची अभिनय क्षेत्रातील रुची वाढली.

मीरा नायर यांचा हॉलीवूडमधील संघर्ष :

१९८० पासून त्यांनी डॉक्युमेंट्री बनवायला सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांच्या डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी अपेक्षित प्रेक्षकवर्गही त्यांना मिळायचा नाही. न्यूयॉर्कमध्ये जेव्हा त्या बसमधून प्रवास करायच्या तेव्हा आपल्या सह पॅसेंजर्सना आपली डॉक्युमेंट्री दाखवायच्या. त्याचप्रमाणे कधी युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन, कधी एखाद्या एनजीओमध्ये जाऊन त्या आपल्या डॉक्युमेंट्री सर्वांना दाखवायच्या. त्यावेळी लोक त्यांना प्रश्न विचारायचे की, ‘इंडियामध्ये नळाला पाणी तरी येते का? अशा बऱ्याच गोष्टींचा सामना त्यांना न्यूयॉर्कमध्ये करावा लागला होता.

एक कलाकार म्हणून त्यांना सर्वात जास्त एकटेपण त्यांना त्या काळात आले होते. आपल्या आयुष्यातील करियरच्या सुरुवातीच्या संघर्षाबद्दल सांगताना त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते, ‘Truth is strange and more powerful than fiction’. त्यामुळे टीपीकल बॉलिवूड मुव्ही बनवण्यावर त्यांनी कधीच भर दिला नाही. FTII च्या कोनवोकेशन समारंभात बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना हाच संदेश दिला की, आपण आपल्या स्वतःच्या देशातील, आजूबाजूला दिसणाऱ्या बऱ्याच संवेदनशील मुद्यावर सिनेमे बनवले पाहिजेत. विविधांगी मुव्हीज बनवून त्या आज भारताचं प्रतिनिधित्व हॉलीवूडमध्ये अतिशय ताठ मानेने करताना दिसून येत आहेत.

मीरा नायर यांचे चित्रपट :

भारतीय समाज तसेच त्यातील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर चित्रपट बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांचा १९८८ प्रदर्शित झाल्यास सलाम बॉम्बे या चित्रपटाला बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म या कॅटेगरीसाठी अकॅडमी अवॉर्ड नॉमिनेशन मिळाले होते. तसेच मान्सून वेडिंग या चित्रपटाला ‘गोल्डन लायन’ हा वेनिस फिल्म फेस्टिव्हलचा मौल्यवान पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर मिसिसिपी मसाला, सुटेबल बॉय आणि कामसूत्र-अ टेल ऑफ लव्ह, प्राईड अँड प्रेज्युडीस या गाजलेल्या चित्रपटांसाठी त्या ओळखल्या जातात.

दिग्दर्शन क्षेत्रातील प्रवास :

डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. आपल्या चित्रपटांद्वारे भारताचे दर्शन घडवण्याची त्यांची इच्छा होती. त्यांनी त्यांची पहिली डॉक्युमेंट्री दिल्लीच्या जामा मशिदी वर बनवली. 18 मिनिटाची ब्लॅक अँड व्हाईट डॉक्युमेंटरी एकदम सही झाली. पहिल्या यशस्वी प्रयत्ना नंतर प्रेरणा घेऊन त्यांनी अजून डॉक्युमेंट्री बनवायला सुरूवात केली. १९८२ साली त्यांच्या ‘सो फार फ्रॉम इंडिया’ या डॉक्युमेंटरीला न्यूयॉर्क ग्लोबल विलेज फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट डॉक्युमेंटरीचा पुरस्कार मिळाला होता. 1983 साली त्यांनी बनवलेल्या सलाम बॉम्बे या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवर २३ पुरस्कार मिळाले होते.

मीरा नायर यांचा हॉलीवूड प्रवास :

व्हॅनिटी फेअर, माय ओन कंट्री, द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट, नफस, क्वीन ऑफ काटवे, वर्डस विथ गॉड, अमेलिया, 8, न्यूयॉर्क आय लव्ह यु, मायग्रेशन, द पेरेझ फॅमिली, इंडियन काबारेट, चिल्ड्रन ऑफ अ डिझायर्ड सेक्स, द डे मर्सिडीज बीकम हॅट, सप्टेंबर 11, जामा मस्जिद स्ट्रीट जर्नल, सो फार फ्रॉम इंडिया, हिस्टेरिक ब्लाइंडनेस या मुव्ही, डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म्सचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. मीराबाई फिल्म्स या टोटल भारतीय नावाने त्यांनी आपले प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आहे. या भारतीय नावाच्या प्रॉडक्शन हाउस खाली आजवर बऱ्याच मोठं मोठ्या हॉलीवूड कलाकारांनी काम केले आहे.

नुकताच त्यांचा क्वीन ऑफ कातवे हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आधुनिकता आणि इंटरनेटच्या जगापासून फार दूर एक मुलगी आहे, तीच आयुष्य म्हणावं तसं अजिबात सुखकारक नाहीये. अश्या आफ्रिकेतील एका मुलीची कथा त्यांनी ह्या सिनेमातून जगासमोर मांडली आहे. त्यांच्या यासारख्या अनेक चित्रपटांच्या माध्यमातून इतर अनेक बॉलीवुड लेखक तसेच दिग्दर्शक शिकत असतात. बॉलीवूडमध्ये रियालिस्टिक सिनेमाची मागणी वाढल्यामागे मीरा नायर यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.

Salaam bombay fame director mira nair’s astonishing hollywood journey

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात