विशेष प्रतिनिधी
मुंबई: बिग बॉसनंतर आता इंडियन आयडल हा लोकप्रिय शो मराठीत लवकरच सुरू होणार आहे. सध्या दूरदर्शन वाहिन्यांवर रिअॅलिटी शो जास्त प्रमाणात दाखवले जात आहेत. रविवारपासून बिग बॉस मराठी सीजन ३ हा कलर्सचा प्रसिध्द रिॲलिटी शो दिमाखात सुरू झाला आहे. सोनी मराठी देखील इंडियन आयडल मराठी हा संगीतमय कार्यक्रम घेऊन येत आहे. हा कार्यक्रम लवकरच प्रदर्शित होणार आहे.
Grab the opportunity to be a part of marathi Indian Idol, Read to know how to participate
नवोदित गायकांना या कार्यक्रमात सहभागी कसे होता येईल व त्याच्या ऑडिशन कधी सुरू होणार याबाबत सोनी वाहिनीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर माहिती दिली आहे. यासाठी सोनी लिव्ह अॅप डाऊनलोड करणे किंवा अॅप असल्यास ते अपडेट करणे आवश्यक आहे. सोनी वहिनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबत एक व्हिडिओ देखील अपलोड करण्यात आला आहे. त्यानुसार अॅप घेतल्यानंतर आपले गाणे घरबसल्या रेकॉर्ड करून ते अपलोड करायचे आहे. घरात बसून या कार्यक्रमाची ऑडिशन देता येणार असल्याने प्रेक्षकांच्या मनात समाधान आहे. तसेच १७ सप्टेंबर पासून ऑडिशन सुरू झालेल्या आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.
Bigg Boss OTT : करिश्मा शाह राकेश बापटला म्हणाली शमिता शेट्टीचा ‘जोरू का गुलाम’, राकेशची माजी पत्नी रिद्धी डोगराला आला राग,म्हणाली….
इंडियन आयडॉल मराठीला चाहत्यांकडून हिंदी इंडियन आयडॉल प्रमाणेच उत्तम प्रतिसाद मिळेल. हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातील व देशातील गायकांना आपली कला सादर करण्याची संधी आहे व यातून नवीन चांगले गायक मिळतील. हा कार्यक्रम किती वाजता प्रदर्शित होईल तसेच या कार्यक्रमातील परिक्षक कोण असतील हे अजून कळलेले नाही. संगीताचे रसिक हा कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पवनदीपने यंदाचा हिंदी इंडियन आयडलचा किताब जिंकला आहे. पवनदीप उत्कृष्ट गायक असून तो एक उत्तम वादक पण आहे. सध्या प्रेक्षकांच्या मनावर त्याच्या आवाजाची मोहिनी पडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App