विशेष प्रतिनिधी
दिल्ली : मानव प्रजाती आणि गोरीला प्रजाती यांचा डीएनए 98.3% सेम असतो. म्हणूनच गोरीला, चिंपांझी, ओरंगुटान, बोनोबो या प्रायमेट्सना मनुष्याचे सर्वात जवळचे नातेवाईक असे म्हटले जाते. सेंट्रल आफ्रिका, वेस्ट आफ्रिका मधल्या घनदाट जंगलांमध्ये प्रामुख्याने गोरिला, चिंपांझी या प्रजाती आढळून येतात. तर बॉर्नियोमध्ये ओरंगुटान ही प्रजाती आढळून येते.
Gorilla in viral photo is no more
अभयारण्यांसाठी तसेच पाळीव प्राणी म्हणून पाळण्यासाठी ह्या प्रजातींचे बऱ्याच मोठ्या प्रमाणात स्मगलिंग केले जाते. त्यांच्या पिल्लांना अगदी लहान वयात त्यांच्या आई पासून वेगळे केले जाते. या क्रूर कृत्याविरुद्ध बऱ्याच वर्षांपासून Peta देखील काम करत आहे.
इंटरनेटवर मध्ये एक फोटो व्हायरल झालेला. फोटो तुम्ही पाहिला असेल. ज्यामध्ये एक रेंजर सेल्फी घेतोय आणि एक गोरिला या सेल्फीसाठी एकदम स्टाईलमध्ये, फुल अटिट्यूडमध्ये पोज देतीये.
या फोटोमधील त्या गोरिलाचे नाव आहे नदाकासी. 2007 मध्ये नदाकासी जेव्हा दोन महिन्यांची होती त्यावेळी याच सेल्फी घेतेलेल्या रेंजरने स्मगलर्स च्या तावडीतून तिची सुटका केली होती. तेव्हा पासूनच ह्या दोघांमध्ये एक प्रेमाचं नात तयार झालं होतं. या रेंजर्सचे नाव आहे अन्ड्र्यू बोम्मा.
अक्राळविक्राळ बारा फुटी नागराजाचा ट्वीटरवर सुळसुळाट
दीर्घ आजारामुळे 14 वर्षाची असतानाच नदाकाशीचे निधन झाले आहे. नदाकाशीने बोम्माच्या कुशीतच शेवटचा श्वास घेतला. व्हायरल झालेली ही गोरिला नेटकऱ्यांची लाडकी गोरिला होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App