भाजपची ८१ जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; महाराष्ट्रातून गडकरी, गोयल, फडणवीस, चंद्रकांतदादा, विजया रहाटकर, मुंडे, तावडे

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने ८१ जणांची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली असून त्यामध्ये पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांच्या पाठोपाठ राज्यसभेचे नेते, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना स्थान देण्यात आले आहे.BJP announces 81-member national executive; Gadkari, Goyal, Fadnavis, Chandrakantdada, Vijaya Rahatkar, Munde, Tawde from Maharashtra

त्याचबरोबर विशेष निमंत्रित म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आले आहे. या खेरीज माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, विनोद तावडे, महाराष्ट्र महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय सचिव अध्यक्षा विजया रहाटकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, लड्डाराम नगवाणी, संजू वर्मा, मुंबईचे आमदार आशिष शेलार, राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार हिना गावित राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्या चित्रा वाघ आदी नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे.येत्या १८ ऑक्‍टोबरला नवी दिल्लीत या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांमध्ये माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी, विद्यमान संरक्षण मंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग, विद्यमान केंद्रीय गृहमंत्री आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आदींचा समावेश करण्यात आला आहे.

याखेरीज भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत भाजपच्या सर्व मोर्चांचे अध्यक्ष, विद्यमान राष्ट्रीय पदाधिकारी, राष्ट्रीय प्रवक्ते, देशातील सर्व प्रदेशाध्यक्ष, सोशल मीडिया संयोजक यामधील नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

BJP announces 81-member national executive; Gadkari, Goyal, Fadnavis, Chandrakantdada, Vijaya Rahatkar, Munde, Tawde from Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या