विशेष प्रतिनिधी
मुंबई : 24 डिसेंबर रोजी 83 हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 25 जून 1983 रोजी इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता. हा विश्वचषकातील सामना त्यांनी वेस्ट इंडिज संघाविरुद्ध जिंकला होता. त्यावेळी विवायन रिचर्ड्स देखील वेस्ट इंडिज संघात होते.
Fashion designer Masaba, daughter of Vivian Richards, shared a special message for 83 movies!
विवीयन रिचर्ड्स यांची मुलगी मसाबा ही एक फॅशन डिझायनर आहे. तर नुकताच मसाबाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्टोरी शेअर केली आहे. तिने आपल्या वडिलांचाच म्हणजे व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा 1983 मधीप एक फोटो शेअर करत एक अतिशय भावनिक पोस्ट लिहिली आहे.
नीना गुप्तां यांनी शेअर केल्या विवियन रिचर्ड्स यांच्या बद्दलच्या गोष्टी
मसाबा म्हणते की, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा रीग्रेट हा आहे की मी ही मॅच पाहू शकले नाही. मला दरवेळी असं वाटतं की कदाचीत ही सर्वोत्तम मॅच पाहायला मी स्टेडियमवर हजर असते. एका बाजूला माझे वडील आणि दुसऱ्या बाजूला माझ्या देशाला खेळतांना पाहणे ह्याच्या पेक्षा मोठं ते काय असू शकतं?
ह्या सिनेमाचा ट्रेलर पाहून तिला हा पिक्चर बघण्याची खूप उत्सुकता आहे असे देखील तिने आपल्या स्टोरीमध्ये लिहिले आहे. 83 हा चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केलेले आहेत. या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोणदेखील आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App