नीना गुप्तां यांनी शेअर केल्या विवियन रिचर्ड्स यांच्या बद्दलच्या गोष्टी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बधाई हो या सिनेमाच्या तुफान यशानंतर रातोरात स्टार झालेल्या अभिनेत्री नीना गुप्ता यांनी नुकताच आपली ऑटोबायोग्राफी पब्लिश केली आहे. ‘सच कहू तो’ असे त्यांच्या पुस्तकाचे नाव आहे. या ऑटोबायोग्राफीमध्ये त्यांनी आपल्या आयुष्याविषयी बरेच खुलासे केले आहेत. तुम्हाला माहीत आहे का, नीना गुप्ता यांना एक मुलगी आहे. जिचे नाव मसाबा गुप्ता असे आहे. वेस्ट इंडीज क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांची मुलगी म्हणजे मसाबा गुप्ता. पण नीना गुप्ता यांनी विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत लग्न केले नव्हते.

Actress neena gupta shares some thrilling memories of past love Vivian Richards

या गोष्टीविषयी त्यांनी बरेच खुलासे आपल्या या पुस्तकामध्ये केले आहेत. त्या म्हणतात की, रिचर्ड्स जागतिक दर्जाचे एक सर्वोत्तम क्रिकेटपटू होते पण त्यांना या गोष्टीचा अजिबात गर्व नव्हता. हीच एक गोष्ट मला त्यांच्याकडे खेचून घेऊन गेली होती.


स्टार किड्स कडूनही मुव्हीज काढून घेतल्या जातात? सोनाक्षी सिन्हाने नेपोटीझमवर व्यक्त केले आपले विचार


नीना गुप्ता यांनी विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत लग्न केले नव्हते. आणि त्या प्रेग्नेंट होत्या. त्यावेळी त्यांना समाजातून बऱ्याच वाईट गोष्टींचा सामना करावा लागला होता. लोकांनी त्यांना नकोनकोते सल्ले दिले होते. एक सल्ला असाही मिळाला होता की, तू एखाद्या गे व्यक्ती सोबत लग्न कर. म्हणजे कोणत्याही टीकेला तुला सामोरे जावे लागणार नाही. तर दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी नीना गुप्ता यांना लग्नाचा प्रस्ताव दिला होता. कारण ही अगदी अजब होते. विवियन रिचर्ड्स वेस्ट इंडिजचे असल्या कारणाने त्यांचा रंग सावळा आहे. तर सतीश कौशिक यांच्या मतानुसार लोक होणाऱ्या बाळाला माझेच बाळ समजतील म्हणून नीना गुप्ता यांना त्यांनी लग्नाची मागणी घातली होती. अशी चर्चा त्यावेळी रंगली होती.

नुकताच अभिनेत्री कल्की कोचेनलाही मुलगी झाली आहे. आणि तिनेही लग्न केलेले नाही. पण कल्कीला कोणत्याही ट्रोलिंगचा सामना करावा लागला नाही. पण नीना गुप्ता यांना मात्र समाजात भरपूर टीकेचा सामना करावा लागला होता. मुलांना जन्म देण्यासाठी स्त्रीला लग्न ह्या बंधनात ला अडकवले जाते? हा प्रश्न कल्की कोचेनने त्यावेळी मांडला होता.

Actress neena gupta shares some thrilling memories of past love Vivian Richards

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात