बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या ब्राम्हणांना शिव्या


विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोचार्चे राष्ट्रीय अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी ब्राम्हणांना शिव्या दिल्या आहेत. पंडित दलितांकडे येतात आणि त्यांची पूजा करतात; परंतु, त्यांच्या घरचे अन्न खात नाहीत. हेच पंडित गरीब लोकांसोबत जेवण घेत नाहीत, तर त्यांच्याकडून रोख पैसे घेतात, असा आरोप मांझी यांनी केला होता.Former Chief Minister of Bihar Jeetanram Manjhi cursed the Brahmins

मांझी यांच्या वक्तव्यानंतर हिंदू पुत्र संघटना आणि श्री रामसेनेच्या लोकांनी मांझी यांचे निवासस्थान गंगाजलाने शुद्ध करण्याची धमकी दिली आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर जीतनराम मांझी यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हिंदू संघटनांकडून संताप व्यक्त होत आहे.



मांझी यांच्या वक्तव्यावर श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत त्यांच्या घराबाहेर यज्ञ केला. समाजात संतापाचे वातावरण असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मांझी यांच्या निवासस्थानापासून काही मीटर अंतरावर भगवान सत्यनारायण यांची पूजा केली.

जीतनराम मांझी यांनी ब्राह्मणांबद्दल दिलेल्या वादग्रस्त विधानाचा परिणाम असा झाला की, त्यांच्याविरोधात बिहारमधील अनेक पोलिस ठाण्यांमध्ये आणि न्यायालयात तक्रारी दाखल झाल्या आहेत. सोबतच त्याच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र, ब्राह्मणांना शिवीगाळ केल्यानंतर मांझी यांनी माफी मागितली होती.

Former Chief Minister of Bihar Jeetanram Manjhi cursed the Brahmins

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!