विशेष प्रतिनिधी
मुंबई: पवार घराण्यावर विश्वास ठेवू नका, हे मी आधीपासूनच सांगत होते. मान्यता प्राप्त युनियन पवारांच्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयातून यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला. अजित पवार यांना विलीनीकरण शक्य नाही, असे माहीत होते, तरीदेखील राष्ट्रवादीने आपल्या जाहीर नाम्यात का उल्लेख केला ? असा सवाल भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.Gopichand Padalkar criticized Pawar
राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर आहेत. एसटी कामगारांचे शासनात विलिनीतरण शक्य नाही, अशी माहिती अजित पवारांनी विधानसभेत बोलताना दिली आहे. यावर टीका करताना पडळकर म्हणाले की, गेली 50 वर्ष हे कर्मचारी तुमच्यावर विश्वास ठेवून आहेत.
ज्यांच्या पाठीमागे कर्मचारी राहिले, त्यांनीच आज कर्मचाºयांचा घात केला. आम्ही आंदोलन करता होतो तेव्हा शिवसेना राष्ट्रवादीवाले म्हणत होते आम्ही कर्मचाऱ्यांना भडकवत आहोत. आम्ही विरोधाला विरोध करणारे नाहीत. आज अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांचे संसार उघड्यावर आले. हे सर्व सरकारचे अपयश आहे. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.
एसटी कामगाराचं शासनात विलिनीतरण शक्य नाही अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडली. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाचा मुद्दा हायकोर्टात आहे. हायकोर्टाच्या निदेर्शावरुन विलिनीकरणाची शक्यता तपासण्यासाठी एक समिती स्थापन झालेली आहे.
त्या समितीने आपला अभ्यास सुरु केलेला आहे, त्या समितीने अभ्यासासाठी मुदत वाढ मागितल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली. समितीचा अहवाल येईल तेव्हा येईल पण एसटी कामगार-कर्मचाºयांचे शासनात विलिनीकरण शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App