अतरंगी रे मुव्ही रिव्ह्यू : ना अक्षय कुमार ना सारा अली खान, अतरंगी रे मध्ये धनुष चकाचक झळकतोय


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सारा अली खान, अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष यांचा अतरंगी रे हा सिनेमा डिस्ने हॉटस्टार वर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट आनंद एल राय यांचा आहे. तेच आनंद एल राय ज्यांनी ‘रांझना’ हा सुपरडुपर क्लासिक डीप इंटेन्स लव्ह स्टोरी सिनेमा बनवला होता. या चित्रपटातील डायलॉग, गाणी या सर्वांनीच प्रेक्षकांवर जादू केलेली होती. अतरंगी रे या सिनेमाचे म्युझिक देखील ए आर रेहमान यांनी दिलेले आहे. Atarangi Ray Movie Review: Neither Akshay Kumar nor Sara Ali Khan

बिहारमधील रिंकू म्हणजे सारा अली खान आपल्या 10 वर्षां जुन्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी घरातून 21 वेळा पळून गेलेली असते. पण प्रत्येकवेळी तिला घरचे पकडून घरी आणतात. एके दिवशी तिच्या घरचे जबरदस्तीने तिचे लग्न एका साउथ इंडियन मुलासोबत लावून देतात. हा साऊथ इंडियन मेडिकल स्टुडंट मुलगा म्हणजेच विशू म्हणजेच धनुष.



धनुषचे ऑलरेडी लग्न ठरलेले असते आणि अचानक झालेल्या या लग्नामुळे तो द्विधा अवस्थेत पडतो. पण त्याच वेळी कुठे तरी त्याला सारा म्हणजे रिंकूसोबत लव्ह अॅट फर्स्ट साइट होते. मग सुरू होतो इथून लव्ह ट्रँगलचा प्रवास.

ए आर रहमानचे म्युझिक या चित्रपटाला मिळाले आहे. त्यामुळे चित्रपटातील चकाचक आणि लिटर लिटल गाणं सोडलं तर बाकी दुसरं कोणतंही गाणं लक्षात राहत नाही. चित्रपटामधील धनुषचे अॅक्टिंग अतिशय उत्कृष्ट आहे. प्रत्येक सीनमध्ये तो भाव खाऊन जातो. अतिशय नॅचरल आणि एकदम सहज पध्दतीने अॅट करणारा त्याच्या सारखा दुसरा अभिनेता कुणीच नाहीये. हा सिनेमा बघताना रांझणा मधील कुंदनची नक्कीच बऱ्याचवेळा आठवण येत राहते. चित्रपटाची कथा वेगळी आहे. त्यामुळे बघण्यात मध्ये एक उत्सुकता राहतेच. मधेमधे अक्षय कुमारच्या प्रेझेन्स ने चित्रपट काही प्रमाणात सुखद वाटतो.

जर आयुष्यामध्ये कोणी सुरवातीच्या काळात अतिशय वेदनादायक घटनेला सामोरे गेले असतील तर बऱ्याच वेळा ते इमॅजिनरी फ्रेंड बनवतात. याला हॅल्युसिनेशन देखील म्हणतात. हॅल्युसिनेशन्स सारखा मुद्दा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे. पण तो तितकासा व्यवस्थित पद्धतीने मांडलेला नाहीये. मेंटल इलनेस ला इतक्या विनोदी पध्दतीने मांडणे कुठेतरी या चित्रपटामध्ये खटकते.

रांझणासारखा एकही आठवणीत राहील असा डायलॉग या चित्रपटामध्ये नाहीये. चित्रपट कुठेही रिअॅलिटीसोबत मिळताजुळता वाटत नाहीये. सारा अली खान अॅक्टिंगच्या बाबतीत अजूनही कुठेतरी कमी पडते असे सतत जाणवते. पण तिच्या जुडवा 2 आणि लव आज कल मधील अभिणयापेक्षा बरीच म्हणावी अशी तिची ऍक्टिग आहे. जेव्हा सारा आणि धनुष एका फ्रेममध्ये असतात प्रत्येक वेळी धनुष अभिनयाच्या जोरावर सीनमध्ये भाव खाऊन जातो.

चित्रपटाची कथा नावा प्रमाणे अतरंगी पात्रे उभी करू शकत नाही. झिरो सिनेमाची कथा देखील चांगली होती. पण तो सिनेमाही कुठंतरी फसला होता. अतरंगी रे हा सिनेमा पहिला की रांझना सिनेमा बनवणारे हेच ते आनंद एल राय का असा प्रश्न पडल्या वाचून राहणार नाही.

Atarangi Ray Movie Review: Neither Akshay Kumar nor Sara Ali Khan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात