विशेष प्रतिनिधी
मुंबई: रियल लाइफ टोनी स्टार्क आणि अब्जाधीश इलोन मस्क यांचे एक ट्विट वायरल झाले आहे. ते परत एकदा ट्विटमुळे चर्चेत आलेले आहेत.
Elon musk is being trolled for this immature tweet again
मस्क युएस सेनेटर बरनी सँडर्स यांच्यावर केलेल्या एका ट्विटमुळे चांगलेच चर्चेत आहेत. या ट्विटमध्ये त्याने असे म्हटले आहे की तुम्ही अजून जिवंत आहेत हेच मी कायम विसरतो आहे. म्हणजेच सॅन्डर्स अजूनही जिवंत आहेत हे त्यांना माहीतच नव्हतं असे विनोदी ट्विट केले. युएस सेनेटर यांनी असे ट्विट केले होते की भरपूर संपत्ती असलेल्या लोकांनी योग्यरीतीने कर भरावा. यावर प्रतिक्रिया देताना इलोन मस्क यांनी हे ट्विट केले.
या सीईओंनी फेसबुकचा वापर कमी व्हावा यासाठी थप्पड मारण्यासाठी हायर केली एम्प्लॉई! ह्या अनोख्या आयडीयावर काय म्हणताहेत इलोन मस्क?
यावर प्रतिक्रिया देताना अनेक जणांनी मस्क यांना ट्रोल केले. एकाने प्रतिक्रिया देताना म्हटले की, तुमच्यासारखे ताकदवान लोकं पैशाने श्रीमंत असतात पण त्याचबरोबर मनाने श्रीमंत असणे गरजेचे आहे. एखादा व्यक्ती मोठा आहे की नाही हे त्याच्या वर्तनावरून दिसून येत असते. तो त्याच्या वरिष्ठांशी कशा पद्धतीने वागतो यावरून दिसून येते. दुसऱ्या व्यक्तीने असे म्हटले की, तू सुद्धा जिवंत आहेस हे मला माहीत नव्हतं. अशा अनेक प्रतिक्रिया देऊन लोकांनी मस्क यांच्यावर चांगलीच टीका केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App