विशेष प्रतिनिधी
मुंबई : खिलाडी अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘रावडी राठोड’ या कॉमेडी चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा बऱ्याच आधी निर्माती शबिना खान यांनी केली होती.
Announcement of the second part of Akshay Kumar and Sonakshi Sinha’s comedy film ‘Rawdy Rathod’
पण कोरोनामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करण्यात आले नव्हते. आता पुन्हा ह्या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू करण्यात आलेले आहे. एस एस राजामौली यांचे वडील विजयेंद्र प्रसाद हे या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिणार आहेत.
नुकताच बजरंगी भाईजान या चित्रपटाचा सिक्वेल देखील सलमान खानने जाहीर केला होता. या चित्रपटाची स्क्रिप्ट देखील एस एस राजामौली यांचे वडील लेखक विजयेंद्र प्रसाद लिहिणार आहेत. 2022 मध्ये रावडी राठोड 2 या चित्रपटाचे शूटिंग सुरु होईल.
बजरंगी भाईजाणचा सिक्वेल लवकरच होणार प्रदर्शित, खुद्द सलमान खानने केली घोषणा
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि खिलाडी अक्षय कुमार हे या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये दिसतील. चित्रपटाची कथा पूर्णपणे वेगळी असणार की हा चित्रपट आधीच्या चित्रपटाचा पुढचा भाग असणार हे अजून मात्र काही कळलेले नाहीय.
नुकताच अक्षय कुमार यांच्या सूर्यवंशी हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता त्यांचा अतरंगी रे हा सिनेमा 24 डिसेंबर रोजी हॉटस्टार डिस्नेवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सारा अली खान, धनुष, अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आनंद एल राय यांचा हा चित्रपट आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App