ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्राने महाराष्ट्राला दिल्या ८ महत्वाच्या सूचना ; वाचा सविस्तर


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारांना एक पत्र लिहून इशारा दिला आहे. Center gives 8 important instructions to Maharashtra to prevent Omicron infection; Read detailed


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतात आतापर्यंत जवळपास २१६ ओमिक्रॉनचे रूग्ण सापडले आहेत.दरम्यान महाराष्ट्रामध्ये ओमिक्रॉनच्या सर्वाधिक केस आहेत.ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना काही निर्देश दिले आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारांना एक पत्र लिहून इशारा दिला आहे.



तसेच महत्वाची माहीती देखील सांगितली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना चाचण्या वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी रुग्णालये सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे आता राज्य सरकारचे टेन्शन वाढले आहे.

केंद्राने या दिल्या महत्वाच्या सूचना

१) स्थानिक आणि जिल्हास्तरावर त्वरित निर्णय आणि कठोर कारवाईची गरज आहे.यामुळे ओमिक्रॉनचा संसर्ग कमी होऊ शकतो.

२) ज्या जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तेथे टेस्टिंग वाढवणे आवश्यक.

३)ज्या जिल्हांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. तिथे रुग्णालयांमध्ये कोविड-१९ शी संबंधित सर्व उपलब्ध सुविधांची खात्री करण्यात यावी.

४)कठोर प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करा आणि गरजेनुसार स्थानिक पातळीवर रात्री कर्फ्यू सारखे निर्बंध देखील लावावां.

५)मोठ्या मेळाव्यावर बंदी आणा आणि लग्नासारख्या समारंभात लोकांची संख्या कमी करा.

६)सर्व रुग्णालयातील पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि अधिसूचित आयसोलेशन झोन यांचाही लवकरात-लवकर आढावा घ्या.

७)सर्व पॉझिटिव्ह लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अनिवार्य.

८) सर्व राज्यांना लसीकरण वाढवून १००% लसीकरण कव्हरेजचे लक्ष्य पूर्ण करण्यास सांगितले आहे.

Center gives 8 important instructions to Maharashtra to prevent Omicron infection; Read detailed

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात