विशेष प्रतिनिधी
मुबंई : रेड चिलीज एंटरटेन्मेंट मार्फत निर्माण करण्यात आलेला बॉब बिस्वास या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 3 डिसेंबर रोजी हा चित्रपट झी फाइव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिषेक बच्चनने प्रमुख भूमिका साकारली आहे. विद्या बालनच्या कहानी चित्रपटातील बॉबी श्वास हे कॅरॅक्टर प्रचंड गाजले होते. या पात्राने बऱ्याच लोकांच्या मनामध्ये भीती देखील निर्माण केली होती. याच कॅरॅक्टरवर आधारित बॉब बिस्वास हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
After watching the trailer of Bob Biswas, Amitabh Bachchan praised Abhishek’s performance
Love you, Pa. But, you’ll always be the BIG B(ob) to us. 💪🏽🙏🏽 — Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 (@juniorbachchan) November 20, 2021
Love you, Pa. But, you’ll always be the BIG B(ob) to us. 💪🏽🙏🏽
— Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 (@juniorbachchan) November 20, 2021
अभिषेक बच्चनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित
अभिषेक बच्चन या चित्रपटामध्ये अतिशय वेगळ्या भूमिकेमध्ये दिसून येतोय. प्रेक्षकांना हा ट्रेलर प्रचंड आवडला आहे असे दिसून येतेय. अभिषेक बच्चन एका वेगळ्या भूमिकेत दिसून आला आहे त्यामुळे अभिषेक बच्चनचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असणार. ट्रेलरमधील अभिषेकचा परफॉर्मन्स पाहून अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवरून आपल्या मुलाचे कौतुक केले आहे. I am proud to say you are my son असे ट्विट करत त्यांनी आपल्या मुलाच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App