विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर खंडणी व नोकरी मिळवण्यासाठी बनावट जातप्रमाणपत्र बनवल्याचा आरोप होत आहे. पण, आता त्यांच्या नावावर बार अँड रेस्टॉरंटचा परवाना असल्याचं समोर आलेआहे.Bar & Restaurant License name of Sameer Wankhede
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.नवी मुंबईतील वाशी येथे हा बार आहे. अबकारी खात्याच्या रेकॉर्डनुसार, हॉटेल सद्गुरूचा परवाना वानखेडे यांच्या नावावर आहे. २७ ऑक्टोबर १९९७ रोजी हा परवाना देण्यात आला होता. नियमानुसार त्याचं नुतनीकरण करण्यात आलं आहे.
हा परवाना ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे. या हॉटेलात विदेशी व भारतीय बनावटीचं मद्य विकण्याची मुभा आहे. बारचा परवाना समीर वानखेडे यांच्या नावावर आहे. भारत सरकारच्या सेवेत आल्यापासून त्यांनी वडील ज्ञानदेव वानखेडे यांना त्याच मुखत्यार पत्र दिलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App