अभिषेक बच्चनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित


विशेष प्रतिनिधी

मुबंई : सुजॉय घोष यांचा कहानी हा सिनेमा तुम्ही पाहिला आहे का? सस्पेन्स, थ्रीलर, मिस्ट्रीने भरलेला कहाणी हा सिनेमा एक उत्कृष्ट सिनेमा होता. विद्या बालन या चित्रपटांमध्ये लीड रोलमध्ये दिसली होती. तर या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले कॅरेक्टर ‘बॉब बिस्वास’ हे शाश्वत चॅटर्जी यांनी प्ले केले हाेते. एलआयसी एजंट असलेले आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंग करणारे बॉब बिस्वास या चित्रपटामध्ये एक महत्त्वपूर्ण कॅरेक्टर होते.

The trailer of the movie ‘Bob Biswas’ starring Abhishek Bachchan has been released

दिसायला अगदी सामान्य, पण अतिशय धूर्त, चतुर, चेहऱ्यावर स्माईल ठेवून, समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून गोळीने मारून टाकणारा बॉब बिस्वास प्रत्येकाला भीती दाखवणाराच होता. याच बॉबीची पुढची कथा आता एका सिनेमातून दाखवली जाणार आहे.


बंटी और बबली 2 चा ट्रेलर झाला प्रदर्शित!


अभिषेक बच्चन या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे. नुकताच ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये बॉब बिस्वास कोमातून उठलेले दाखवण्यात आलेले आहेत. पण आपण एक कॉन्ट्रॅक्ट किलर आहोत हे मेमरी लॉसमुळे ते विसरले आहेत. पण त्यांनी आधी ज्यांच्यासोबत काम केले आहे, त्यांना असे वाटते आहे की बॉबने पुन्हा कॉन्ट्रॅक्ट किलिंग सुरू करावे. चित्रांगदा सिंग या चित्रपटामध्ये अभिषेक बच्चनच्या बायकोची भूमिकेत दिसणार आहे.

कहानी सिनेमात बॉब यांचा अॅक्सिडेंट होऊन ते मृत पावले आहेत, असे दाखविण्यात आले होते. बॉब बिस्वास यांचा हा चित्रपट कहाणीचा दुसरा सिक्वेल असणार का? यावर प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे.
3 डिसेंबर 2021 रोजी हा चित्रपट झी फाइव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

The trailer of the movie ‘Bob Biswas’ starring Abhishek Bachchan has been released

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण