बंटी और बबली 2 चा ट्रेलर झाला प्रदर्शित!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या बंटी और बबली या सिनेमाचा दुसरा पार्ट लवकरच रिलीज होणार आहे. पहिल्या भागामध्ये राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते. बंटी और बबली 2 या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमामध्ये राणी मुखर्जी, सैफ अली खान, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि शर्वरी हे प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

Trailer of Bunty Aur Babli 2 released!

या ट्रेलरवरून या सिनेमाची स्टोरी अतिशय झकास आहे असे दिसते आहे. बंटी आणि बबली दोघांनीही 15 वर्षांपूर्वीच चोरी करण्याचे काम सोडून दिलेले आहे. बंटी तिकीट कलेक्टरचे काम करतोय तर बबली हाउसवाइफ आहे. त्या दोघांना एक मुलगाही झाला आहे. दोघे अगदी साधे व्यवस्थित आयुष्य जगत असतानाच दुसरीकडे मात्र बंटी बबली हा ‘ब्रॅण्ड’ वापरून सिध्दार्थ चतुर्वेदी आणि शर्वरी चोऱ्या करत असतात. पोलिसांना मात्र राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांच्यावर शंका येते.


कार्तिक आर्यनच्या धमाका सिनेमाचा ट्रेलर झाला प्रदर्शित


आपला चोरीचा ब्रँड कोणीतरी दुसरे लोक वापरत आहेत म्हणून सैफ अली खान, राणी मुखर्जी आणि पोलीस देखील बनावटी बंटी बंबलीला पकडण्यासाठी मागे लागतात. अशी काहीशी या सिनेमाची कथा असणार आहे असे ट्रेलर मधून लक्षात येतेय.

या सिनेमाचे दिग्दर्शन वरून व्ही शर्मा यांनी केले आहे. याआधी त्यांनी सुल्तान आणि टायगर जिंदा है या दोन सुपरहिट सिनेमांसाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केले होते. तर यशराज फिल्म्स बॅनरखाली हा सिनेमा बनवला जाणार आहे. सिद्धार्थ चतुर्वेदी आणि शर्वरी नवीन बंटी बबली म्हणून कसे दिसतील यासाठी या सिनेमाची प्रेक्षक अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत.

द पंकज त्रिपाठी या सिनेमामध्ये पोलिसाचा रोल प्ले करताना दिसून येणार आहेत. 2005 मध्ये रिलीज झालेल्या बंटी बबलीमध्ये हा रोल अमिताभ बच्चन यांनी प्ले केला होता. याच सिनेमातील ‘कजरा रे’ हे गाणे सुपरहिट झाले होते. मस्ती, मजा, फन, वेडेपणाने भरलेला हा ट्रेलर प्रेक्षकांचे मनोरंजन नक्की करेल असा विश्वास या सिनेमाच्या मेकर्सनी ट्रेलर रिलीज कार्यक्रमावेळी व्यक्त केला आहे. हा सिनेमा 19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Trailer of Bunty Aur Babli 2 released!

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”