विशेष प्रतिनिधी
दिल्ली : बिग बॉस या शो मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री सना खान सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सना खानने ‘जय हो’ आणि ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ इत्यादी फिल्म्समध्ये काम केले होते. मालविन लुईस सोबतच्या अफेअरमुळे देखील ती बरीच चर्चेत असायची.
Actress sana khan’s husband used to call her sister before marriage?
नोव्हेंबर मध्ये तिने गुजरातमधील मौलवी अनस सैय्यद सोबत लग्न केले आहे. लग्नानंतर तिने अभिनय क्षेत्र पूर्णपणे सोडून दिले आहे. एकेकाळी आपल्या ग्लॅमर आणि मॉडर्न अंदाजासाठी ओळखली जाणारी सना आता बुरख्यामध्ये वावरताना दिसून येते. तिच्या चाहत्यांसाठी तसं पाहायला गेलं तर हा एक मोठा धक्काच होता. सना सध्या आपल्या एका व्हायरल व्हिडीओ मुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
अलविदा : सना खान नंतर ‘रोडिज’ साकिबचे ग्लॅमर जगताला ‘अलविदा’! ‘आता संपूर्णपणे अल्लाहला शरण’
आपल्या लग्नाबद्दल बऱ्याच गोष्टी सनाने एका कार्यक्रमादरम्यान शेअर केल्या होत्या. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सना सांगतेय, दुबईमधील एका कार्यक्रमादरम्यान ती अनस सय्यद यांना पहिल्यांदा भेटली. जेव्हा जेव्हा ती आणि अनस भेटायचे तेव्हा तो तिला ‘जी बेहेन’ ‘हा बेहेन’ असे संबोधायचा तर ती ही त्याला ‘जी मौलाना’ म्हणून संबोधायची. ही गोष्ट शेअर करताना सनाला स्वतःला देखील हसू आवरत नव्हते.
सना पुढे सांगते की, ‘लहानपणी आम्ही जेव्हा मौलानांना बघायचो तेव्हा पळून जायचो कारण आम्हाला असे वाटायचे की हे आपल्याला पकडून नरकामध्ये पाठवतील. पण अनसला भेटल्यानंतर सगळं बदलून गेलं. मी कधीच विचार केला न्हवता की अनस आणि मी आयुष्यभरासाठी एकमेकांशी जोडले जाऊ.’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App