विशेष प्रतिनिधी
मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा या सुप्रसिद्ध मालिकेतील नटू काका यांनी ७७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मालाड मधील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. गेल्या काही महिन्यांपासून घनश्याम यांची कर्करोगाशी झुंज चालू होती. सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचे निधन झाले व तारक मेहताच्या कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. टीव्ही इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता हरपला.
Actor Ghanyshyam Nayak (Nattu Kaka) passes away, Tarak Mehta team pays tribute to him
तारक मेहता मधील त्यांचे सहकलाकार दिलीप जोशी, मुनमुन दत्ता, भाव्या गांधी आणि असित कुमार मोदी यांनी काल त्यांना श्रद्धांजली वाहिली. जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी हे घनश्याम नायक यांच्या खूप जवळचे होते.
बबीताचे पात्र साकारणारी मुनमुन हिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर या दिग्गज अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली. तिने त्यांच्या सोबतचे काही आठवणीतले फोटो तसेच त्यांच्यामधला बाँड आणि त्या दोघांची झालेली शेवटची भेट याबद्दल सांगितले.
गोकुळधाम सोसायटीत आनंदी आनंद! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये नोंद
तारक मेहता सेटवर परत येऊन काम करण्याची त्यांची इच्छा होती. ते असं म्हणाले होते की त्यांना अखेरच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे. घनश्याम यांच्या कामासाठी त्यांना सेटवर स्टँडिंग ओवेशन दिले जायचे. ते पूर्णपणे तंदुरुस्त आहेत हे सांगण्यासाठी त्यांनी सेटवर दोन संस्कृत शलोकसुद्धा म्हंटले होते. तारक मेहता सिरीयल चे क्रियेटर असित कुमार मोदी यांनी ही बातमी ट्विटरवर कन्फर्म केली. त्यानंतर म्हणाले की घनश्याम नायक हे आमचे तसेच कुटुंबाशी खूप जवळचे होते. ते पुढे म्हणाले की वर्षानुवर्षे आम्हाला त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळत राहिले त्यांची अनुपस्थिती आम्हाला जाणवेल तसेच या महान अभिनेत्याला आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि या कठीण काळामध्ये आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App