मौलाना सादमुळे असाही पसरला चीनी व्हायरस


तबलिगी जमातीचा प्रमुख मौलाना साद याने आयोजित केलेल्या मरकझमुळे चीनी व्हायरसचा अनेकांमध्ये फैलाव झाला. पण आता आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला  आहे. मौलाना सादच्या फार्म हाऊसवर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरिक्षकाला चीनी व्हायरसची बाधा झाली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तबलिगी जमातीचा प्रमुख मोलाना साद याने आयोजित केलेल्या मरकझमुळे चीनी व्हायरसचा अनेकांमध्ये फैलाव झाला. पण आता आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला  आहे. मौलाना सादच्या फार्म हाऊसवर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरिक्षकाला चीनी व्हायरसची बाधा झाली आहे.

मौलाना सादचे उत्तर प्रदेशातील श्यामली येथे फार्महाऊस आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकझमध्ये चीनी व्हायरसचा फैलाव झाला होता. त्यामुळे तबलिगी जमातचे अनेक जण बाधित झाले होते. तरीही हे लोक तेथून बाहेर येण्यास तयार नव्हते. शेवटी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मध्यस्ती करून सर्व तबलिगींना रुग्णालयात पोहोचविले. त्यानंतर मौलाना साद फरार झाला होता.

याच प्रकरणी त्याच्या श्यामली येथील फार्महाऊसवर दिल्ली पोलीसांनी छापा घातला होता. त्यातील एक पोलीस उपनिरिक्षक चीनी व्हायरसने बाधित झाल्याचा अहवाल ३ मे रोजी प्राप्त झाला. यानंतर प्रशासनाने श्यामली येथील कांधला पोलीस ठाण्यातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले आहे. हे पाचही जण छापा घालताना या पोलीस उपनिरिक्षकासोबत होते. त्यांच्या घशातील द्रवाचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

दिल्ली पोलीस अनेक दिवसांपासून  मौलाना साद याच्या मागावर आहेत. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेही घातले आहेत. परंतु, ‘दिल्ली पोलिसांना माझा ठावठिकाणी ठावूक आहे’ असे खुद्द मौलाना साद यानं एका चॅनलशी बोलताना सांगितले होते. पोलिसांनी मला चीनी व्हायरसची  टेस्ट करण्यास सांगितलं होतं तीदेखील मी केलीय, असे त्याने म्हटले होते. परंतु, अद्याप रिपोर्ट आलेला नाही. टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर त्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागाला देण्यात येईल, असे त्याने सांगितले होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात