अबब…९३% लोकांचा मोदींवर विश्वास! आयएनएस – सी व्होटर ट्रँकरचे सर्वेक्षण


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोविड १९ च्या प्रादूर्भावानंतरची परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार चांगली हाताळत आहे, असा विश्वास देशातील ९३.५% जनतेने व्यक्त केला आहे.

आयएनएस – सी व्होटर ट्रँकरचा हा निष्कर्ष आहे. मोदी सरकार यशस्वीरित्या परिस्थिती हाताळत आहे, असा प्रश्न १६ मार्च ते २१ एप्रिल दरम्यान ट्रँकरवर टाकण्यात आला होता. त्याला ९३% लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात या ट्रँकरची सुरवात केली होती.

लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी ७६.८% जनतेने मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला होता. त्यानंतर टप्प्या टप्प्याने मोदींवरील विश्वासाच्या टक्केवारीत भर पडत गेली. ३१ मार्चला ७९.३% तर १ एप्रिलला ८९.९% पर्यंत ही टक्केवारी वाढली. २१ एप्रिलला ही टक्केवारी ९३.५% वर पोहोचली.

“सत्य हे आरशासारखे लख्ख दिसते. त्याला दुसऱ्या पुराव्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची सगळे जग प्रशंसा करते आहे”, असे ट्विट गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात