लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधकांनी मत चोरीच्या मुद्द्यावरून बाहेर मोठा बवाल चालवलाय; प्रत्यक्षात विरोधकांपुढे खासदारांचे सध्याचे संख्याबळच टिकवण्याचे खरे आव्हान आहे, हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय सत्य समोर आले.
सगळ्यांचेच संख्याबळ तोकडे, म्हणूनच कुठे काय मिळते का बघायला मातोश्रीवर भेटले!!, अशी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची अवस्था आली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि आमदार अमिन पटेल हे आज उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले होते. तिथे त्यांनी राज्याच्या राजकारणा संदर्भात विविध अंगांनी चर्चा केली. या चर्चेची माहिती बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना दिली. या भेटीचे फोटो सगळ्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वर शेअर केले.
भारताच्या लॉबिंग नंतर डोनाल्ड ट्रम्पची खरंच चुकीची कबुली की तात्पुरती उपरती??, असा सवाल विचारायची वेळ डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमच्या वर्तणुकीतून समोर आली.
सत्ताधारी NDA खासदारांच्या कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले शेवटच्या रांगेत!!, असे चित्र आज दिसून आले. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची दोन दिवसांची कार्यशाळा संसदेत असणाऱ्या जी एम सी बालयोगी सभागृहात आज सुरू झाली.
केलेल्या कामाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिराती झाल्या. त्यामुळे पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांना पोटदुखी झाल्याचे समोर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केली मनोज जरांगे यांचे आंदोलन संपले. ते मुंबईतून आंतरवली सराटीत गेले. त्यामुळे अनेकांचे पापड मोडले. कारण मनोज जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधायचे अनेकांची कारस्थाने उधळली गेली.
बेकायदा खनन आणि मुरुम उपसा प्रकरणी आपल्या कार्यकर्त्यांना वाचवायला गेलेले पण त्याचवेळी महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमबाजी करून बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे आमदार अमोल मिटकरी अचानक नरमले कसे आणि त्यांना कोणी नरमवले
भरपूर भडकावू बडबडीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी काढला सौम्य सूर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील बदलला नूर; पण म्हणून मोदींनी आपली ठाम भूमिका बदलून अमेरिकेचा दौरा करायचे निश्चित केले,
अमेरिकेला एक ट्रम्प नाही पुरला म्हणून दुसरा पुढे आला; भारत अमेरिकेला sorry म्हणेल, असा त्याने दावा केला!! ट्रम्प प्रशासनाचे डोके फिरलेले आहे असेच म्हणायची वेळ वेगवेगळ्या दाव्यांमुळे आली.
भारताबरोबर टेरिफ युद्ध सुरू केलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या ट्रूथ सोशल मीडिया अकाउंट वर सत्य बोलले, पण ते अर्धसत्य ठरले!! 5 सप्टेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ अकाउंट वर अमेरिकेने भारत आणि रशिया यांना चीनच्या खोल आणि अंधाऱ्या गर्तेतत गमावले. त्यांचे संबंध तिथे तरी दीर्घकाळ चांगले राहोत, असे लिहिले.
भारताबरोबर टेरिफ युद्ध मांडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या CEO गाला डिनर पार्टीत भारतीय कम्युनिस्ट दिग्गज नेत्याचा बडा भांडवलदार पुतण्या सामील झाला होता, पण त्याकडे भारतीय माध्यमांचे किंवा जागतिक माध्यमांचे नेमकेपणाने लक्ष गेले नाही.
ममता बॅनर्जी बनल्या आणीबाणीतल्या इंदिरा गांधी; बंगाल फाइल्स सिनेमावर पश्चिम बंगालमध्ये आणली प्रदर्शना आधीच अघोषित बंदी!!, असले राजकारण पश्चिम बंगाल मध्ये घडले. विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांची निर्मिती असलेल्या बंगाल फाइल्स सिनेमाचा उद्या प्रारंभ होत आहे.
बहुचर्चित GST सुधारणांना उशीर झाल्याबद्दल काँग्रेसने केली मोदी सरकारवर टीका, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी expose केली काँग्रेसच्या राजवटीतील GST लादायची भूमिका!!, असे राजकारणात दिल्लीत घडले.
केंद्रातल्या मोदी सरकारने केलेले GST Reforms फक्त दिवाळी धमाका नाही, तर अमेरिकेबरोबरच्या भारताच्या पुढच्या आर्थिक लढाईत मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या पाठिंबा सरकारच्या पाठीशी भक्कम उभा करणारे Game Changer ठरण्याची तजवीज आहेत. GST reforms
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या मराठा आरक्षणाच्या अख्ख्या राजकारणात काँग्रेसच्या नेत्यांना घातले खोपच्यात
मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी आनंद व्यक्त केला, तर छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातला. लक्ष्मण हाके यांनी देखील सरकारवर आगपाखड केली,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ज्या पद्धतीने मनोज जरांगे यांच्या विशिष्ट मागण्या मान्य करून मराठा आरक्षण हैदराबाद आणि सातारा गॅझेट नुसार लागू करण्याचा निर्णय घेतला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठा आरक्षणाच्या नावाखाली सुरू केलेले आंदोलन मनोज जरांगे यांनी मागे घेतले. फडणवीस सरकारने मनोज जरांगेंच्या हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर लागू करण्याच्या मागण्या मान्य केल्या.
मनोज जरांगे यांनी चालविलेल्या मराठा आंदोलनाचे राजकीय दिग्दर्शक कोण??, या आंदोलनातून कुणाला राजकीय पोळी भाजायची आहे??, या सवालांची उत्तरे सगळ्या महाराष्ट्राला माहिती असताना संबंधित आंदोलन वेगळ्याच दिशेने नेण्याचा खेळ तिसऱ्याच पार्टीने सुरू केल्याचे राजकीय वास्तव समोर आले.
महाराष्ट्रात आणि देशात जशी जाती द्वेषाची लागण होऊन वेगवेगळी आंदोलने उभी राहिली, तशीच जाती द्वेषाची लागण अमेरिकेत झाली असून तिने ट्रम्प प्रशासनाला घेरून टाकल्याचे दिसून आले. त्यातूनच ट्रम्पचा व्यापार सल्लागाराने ब्राह्मणांविरुद्ध तोंडसुख घेतले!!
ट्रम्प टेरिफचा सगळ्या जगाच्या डोक्याला ताप झाला असताना चीनने भारताला जवळ केले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारत आणि चीन यांच्या आपल्या संबंधांमध्ये सुधारणा करण्यासाठी चार सूत्रे सूचविली. त्या सूत्रांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकारात्मक आणि सावध प्रतिसाद दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली होती युरोपियन राष्ट्रप्रमुखांची “शाळा”; पण SCO मध्ये भारत चीन आणि रशिया यांच्यासह महत्त्वाच्या राष्ट्रप्रमुखांचा भरला समानता मेळा!! हे परस्पर विरोधी आणि परस्पर विसंगत चित्र समोर आले.
चीन मधल्या तिनजिआंग मधून ड्रॅगन आणि एकत्र येण्याच्या नुसत्या घोषणा झाल्या, पण तेवढ्या घोषणांनीच भारतातले मार्क्सवादी कम्युनिस्ट खूश झाले. शी जिनपिंग यांच्या चिनी नेतृत्वाची स्तुती करायला लागले.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे हत्यार घेऊन मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानात पोहोचले असले आणि त्यांनी जाहीरपणे मराठा आरक्षणाचा एल्गार केला असला तरी जरांगे यांच्या आंदोलनाची वेगवेगळी वळणे आणि वळसे पाहता, तीन टार्गेट्स असल्याचे लक्षात येते. मराठा सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाच्या आवरणाखाली राजकीय आरक्षण साध्य करून घेणे, देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मण मुख्यमंत्र्याला हटविणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीच्या हातात संपूर्ण महाराष्ट्र सोपविणे ही तीन टार्गेट्स आहेत. शरद पवारांच्या राजकीय भूमिका बदलांशी अनुकूल ठरणारी टार्गेट्स जरांगेंना त्यांनी दिली आहेत.
कुठल्याच निवडणुकीमध्ये कुठलेच यश मिळत नाही म्हणून राहुल गांधी आता एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील ते विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!! बिहार मधल्या मतदार अधिकार यात्रेतून दिसलेल्या चित्राचा खरा अर्थ आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा मुंबईत दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर पवार आणि ठाकरे यांच्या नेत्यांनी त्या आंदोलनात घुसखोरी केली आहे. पण त्याचवेळी पवार आणि ठाकरे यांची ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत भूमिका मात्र संशयाच्या घेऱ्यात आली आहे
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App