याला म्हणतात, Assignment based काम; CJP आंदोलनाच्या गदारोळात शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!!
याला म्हणतात, Assignment based काम, असंच म्हणायची वेळ शरद पवारांनी आज घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर आली.
याला म्हणतात, Assignment based काम, असंच म्हणायची वेळ शरद पवारांनी आज घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर आली.
लडाखचे पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अशी प्रतिमा तयार केलेले सोनम वांगचुक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
CJP कॉकरोज जनता पार्टीने सुरू केलेल्या आणि सगळ्या विरोधकांनी सामील होऊन चिघळलेल्या आंदोलनाचे खरे टारगेट मोदी – शहाच आहेत
सर्वोच्च न्यायालयाने APAAR ID संदर्भात कठोर निर्णय दिला आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की, कोणतीही शाळा स्वतः मुलांची अपार आयडी बनवू शकत नाही. यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे.
दिल्लीत आपल्या रास्त मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ला आणि बेछूट लाठीचार्जच्या घटनेचे संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पोलिसांच्या या अमानुष दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि रस्त्यावर उतरलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.
दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर सुरू असलेल्या काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास आंदोलनस्थळी दाखल झाले. ते मंचावर येताच, ‘महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते आपल्यात आले आहेत’, अशी माहिती अभिजीत दिपके यांनी देताच आंदोलकांनी एकच जल्लोष केला. या उत्साही वातावरणात उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करत आपली सविस्तर भूमिका मांडली.
आषाढी एकादशीचा सोहळा 25 जुलै रोजी साजरा होत असून पंढरपुरात दोन लाखांहून अधिक वारकऱ्यांची मांदियाळी जमली आहे. विठ्ठल दर्शन रांगेत सध्या २० हजारांहून अधिक भाविक उभे असून दर्शनासाठी 12 ते 14 तासांचा अवधी लागत आहे. दर्शनरांग गोपाळपूरजवळील सोळा नंबर शेडपर्यंत गेली असून दर्शन वेग प्रति मिनिट 32 ते 35 आहे. व्हीआयपी दर्शन बंद असले तरी रांगेत घुसखोरी आणि पिण्याच्या पाण्याच्या गैरसोयीच्या अनेक तक्रारी आहेत.
सिक्कीममध्ये एनएचपीसीच्या जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या 25 पैकी 20 मजुरांचे मृतदेह मंगळवारी रात्री उशिरा बाहेर काढण्यात आले. बचावकार्यात गुंतलेल्या पथकांना रात्री उशिरापर्यंत उर्वरित पाच मजुरांपर्यंत पोहोचता आले नाही.
राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमुक्तीची पहिली यादी उद्या बुधवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणारा प्रोत्साहनपर लाभ आता ५० हजारांवरून थेट २ लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने योजनेची अंमलबजावणी वेगाने केली जात आहे,अशी माहिती मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
युक्रेनमधील ओडेसा बंदरातून निघालेल्या ‘एमव्ही गोल्डन लिओ’ या मालवाहू जहाजावर रविवारी झालेल्या हल्ल्यात चार भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. एक भारतीय गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ब्रिटनमध्ये सोमवारी अँडी बर्नहॅम यांनी नवीन पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. गेल्या 10 वर्षांत ते ब्रिटनचे सातवे पंतप्रधान बनले आहेत. त्यांनी देशाच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेत मोठ्या बदलांचे आश्वासन दिले आहे आणि म्हटले आहे की, त्यांचे सरकार लोकांच्या दैनंदिन समस्यांवर, जसे की महागाई आणि खराब सार्वजनिक सेवांवर, सर्वाधिक लक्ष केंद्रित करेल.
चीनमध्ये फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या 56 वर्षीय वांग जिबिंग यांना देशातील सर्वात प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांपैकी एक असलेला लू शुन साहित्य पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या ‘लो फ्लाइट’ या कविता संग्रहाला हा सन्मान देण्यात आला आहे. या पुस्तकातील अनेक कविता त्यांनी फूड डिलिव्हरीच्या कामादरम्यान मिळालेल्या मोकळ्या वेळेत कागदाच्या लहान-लहान तुकड्यांवर लिहिल्या होत्या.
राहुल गांधींच्या आंदोलनाला आज शरद पवारांनी छेद दिला. राहुल गांधी हे काँग्रेसच्या खासदारांसह पंतप्रधानांचे निवासस्थानासमोर लोककल्याण मार्गावर आंदोलन करत असतानाच शरद पवार तिथे पोहोचले नाहीत
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी सोमवारी दुपारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले – एसआयटीची पुनर्रचना केली जावी, ज्यात काही वरिष्ठ तज्ञ असावेत, आयपीएस अधिकाऱ्याने तपास पथकाचे नेतृत्व करावे, जेणेकरून तपास एखाद्या निर्णायक टप्प्यावर पोहोचेल.
नाशिकच्या लेकीचा आणखी एक मानाचा तुरा उंचावला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सन्माननीय अध्यक्षा श्रीमती विजयाताई रहाटकर यांना राजस्थानमधील प्रतिष्ठित महाराजा गंगा सिंह विद्यापीठ, बीकानेर यांच्यातर्फे “मानद डी.लिट.” (Doctor of Literature – Honoris Causa) ही सर्वोच्च मानद पदवी जाहीर करण्यात आली आहे.
CJP च्या आंदोलनात काँग्रेसवाले घुसले; लोककल्याण मार्गावर राहुल गांधी कमरेवर हात ठेवून उभे राहिले!!, असे चित्र आज 21 जुलै 2026 रोजी दुपारी दिसले. कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेले आंदोलन सर्व विरोधी पक्षांनी ताब्यात घेतली पाहिजे
समाजवादी पक्षाने सोमवारी दावा केला की, दिल्ली पोलिसांनी खासदार डिंपल यादव यांना ताब्यात घेतले आहे. डिंपल, इकरा हसन आणि प्रिया सरोज पक्षाच्या इतर खासदारांसोबत ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या समर्थनार्थ संसदेपासून जंतर-मंतरपर्यंत पायी मोर्चा काढत होत्या.
ब्रिटनमध्ये विरोधी पक्षांनी पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. पाकिस्तानने बाल लैंगिक गुन्हेगार शब्बीर अहमदला परत घेण्यास नकार दिल्यानंतर, जोपर्यंत पाकिस्तान अशा दोषींना स्वीकारत नाही, तोपर्यंत त्याला दिली जाणारी आर्थिक मदत आणि नवीन व्हिसा जारी करण्यावर बंदी घालावी, असे विरोधकांनी म्हटले आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून येत आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे ब्रेंट क्रूड ऑइल आज 90 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहे.
शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या तोंडून आज “राजकीय सत्य” बाहेर पडले. त्यांनी अभिजीत दिपके याने सुरू केलेले आंदोलन सगळ्या विरोधी पक्षांनी ताब्यात घ्यायची भाषा केली. त्यामुळे सगळे विरोधी पक्ष अभिजीत दिपके याच्यामागे फरफटत गेल्याचे राजकीय वास्तव सगळ्यांच्या समोर आले.
NEET पेपरफुटीत सामील असलेल्यांना शिक्षा होईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NDA संसदीय पक्षाच्या बैठकीत सर्व पक्षांना आणि देशभरातील विद्यार्थ्यांना खात्री दिली. पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण केले जाईल, अशी त्यांना खात्री दिली जावी, असे पंतप्रधानांनी सर्व पक्षांच्या खासदारांना सांगितले.
केंद्र सरकारने आज, म्हणजेच 20 जुलै रोजी स्पष्ट केले आहे की, घरगुती आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी इक्विटी व्यवहारांवर लागणारा दीर्घकालीन भांडवली नफा (LTCG) कर रद्द करण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही.
पंतप्रधान मोदींनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मीडिया ब्रीफिंगमध्ये राहुल गांधींच्या वयावरून टोमणा मारला. पंतप्रधान भारताच्या पहिल्या खाजगी रॉकेट ‘विक्रम-1’ ला कक्षेत पाठवणाऱ्या स्कायक्रूट एरोस्पेस कंपनीचा उल्लेख करत होते.
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात दगडफेक करून हिंसाचार माजवून दहशत निर्माण करणाऱ्या आंदोलकांचा पोलिसांनी पर्दाफाश केला
मनोज जरांगे पाटील यांनी या विस्तारावरून महायुती सरकारला थेट आव्हान दिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनरागमन चर्चेवर जरांगे पाटील कमालीचे भडकले आहेत. “धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देता ते बघतोच. मुंडेंना पुन्हा मंत्री केले, तर मराठा समाज अंगावर येईल,” असा आक्रमक इशारा त्यांनी दिला आहे.