विशेष प्रतिनिधी
मुंबई : Prakash Ambedkar दिल्लीत आपल्या रास्त मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ला आणि बेछूट लाठीचार्जच्या घटनेचे संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पोलिसांच्या या अमानुष दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि रस्त्यावर उतरलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.Prakash Ambedkar
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट करत, राज्यातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांना या आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचे थेट आवाहन केले आहे.Prakash Ambedkar
नेमके काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर म्हणाले, काल विद्यार्थ्यांच्या आंदोलनात दिल्ली पोलिसांनी छर्रे वापरलेत. असे छर्रे वापरता येणार नाही, अशी बंदी युनायटेड नेशनने घातल्यानंतर सुद्धा दिल्ली पोलिस छर्रे वापरते. वॉटर कॅनने पोरांना मारले जात आहे, अमाणुष लाठीचार्ज केला जातोय, या लाठीचार्जवरून दिसतंय की, जालियानवाला बागचा जनरल डायर हा पुन्हा जन्माला आलाय आणि त्याची ही कृती आहे का? असे दिसतंय, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
“ज्या प्रकारे परीक्षेमधील घोटाळे होत आहेत आणि एकंदरीत जे दिसतंय विद्यार्थ्यांची विचार करण्याची कृती आणि निर्णयाची कृती ही शिक्षणाच्या, परीक्षेच्या माध्यमातून होते. तिलाच खुंटीत घालण्याचे कामकाज चालले आहे. अशिक्षित ठेवणे हा सरकारच भाग राहिलाय. लोक अशिक्षित राहिती, तर आपली सत्ता कायम राहील, असा आभास निर्माण केला जातोय. त्याविरोधात हा २३ जुलैचा बंद आम्ही जाहीर केलेला आहे,” अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली.
“नागरिकांना आम्ही आवाहन करतोय की, हुकूमशाही यायला लागली आहे. सगळे राजकीप पक्ष मोडकळीस काढायला निघालेले आहेत. अशावेळेस सामान्य नागरिकांनी रस्त्यावर येऊन आपले असणारे मत आणि भूमिका मांडली पाहिजे. २३ जुलैच्या बंदमध्ये सामान्य माणूस सहभागी होईल,” असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला.
Prakash Ambedkar Calls ‘Maharashtra Bandh’ on July 23 Over Student Police Action
महत्वाच्या बातम्या
- Ukraine : युक्रेनमध्ये जहाजावर हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू; भारताने म्हटले- व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे निंदनीय
- Andy Burnham Sworn : अँडी बर्नहॅम ब्रिटनचे नवे पंतप्रधान; 10 वर्षांत सातवे पंतप्रधान बनले; पाकिस्तानी वंशाच्या शबाना महमूद अर्थमंत्री होऊ शकतात
- Food Delivery : चीनमध्ये फूड डिलिव्हरी बॉयला सर्वात मोठा साहित्यिक सन्मान; जेवण पोहोचवताना अनेक कविता लिहिल्या
- Ram Mandir : राममंदिर देणगी चोरी- SC म्हणाले- यूपी सरकारने पुन्हा SIT करावी; IPL अधिकाऱ्याला जबाबदारी सोपवा, प्रकरणाचे राजकारण होऊ नये