Nitesh Rane : दिशा सालियन प्रकरणात ‘पिक्चर अभी बाकी’; नीतेश राणेंचा आदित्य ठाकरेंना इशारा; 16 तारखेच्या सुनावणीची वाट पाहा
भाजप नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी गुरूवारी दिशा सालियन प्रकरणात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना सूचक इशारा दिला. दिशा सालियनच्या वडिलांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरे व डिनो मोरिया याच्यासह अनेकांची नावे घेतली आहेत. या प्रकरणी येत्या 16 तारखेला सुनावणी होणार असून, तोपर्यंत थांबा, असे ते म्हणालेत.