Odisha High Court : ओडिशा उच्च न्यायालयाच्या निर्णयावर संताप: सहा वर्षीय मुलीवर बलात्कार आणि खून करणाऱ्या आरोपीची फाशी नमाज पठण करतो म्हणून रद्द
ओडिशा उच्च न्यायालयाने सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या शेख आसिफ अली याची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेत रूपांतरित केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. नियमित नमाज पठण, पश्चात्ताप आणि सुधारलेल्या वर्तनाचा दाखला देत न्यायमूर्ती एस. के. साहू आणि न्यायमूर्ती आर. के. पटनायक यांच्या खंडपीठाने हा धक्कादायक निर्णय दिला आहे.