Siddaramaiah : सिद्धारामय्यांची घोषणा- 2028 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही; म्हणाले- राजकारण भ्रष्ट झाले; दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रीपद सोडले होते
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे की, ते 2028 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. मात्र, ते राजकारणात सक्रिय राहतील आणि जनतेचे प्रश्न मांडत राहतील. त्यांनी शनिवारी मंड्या जिल्ह्यातील के.आर. पेट येथे आयोजित एका कार्यक्रमात सांगितले की, राजकारण आता पूर्णपणे भ्रष्ट झाले आहे आणि प्रामाणिक राजकारणासाठी जागा राहिलेली नाही.