• Download App
    RHA CJP, E20 जनता पार्टीच्या बरोबरीने RHA चा पण उदय, तब्बल 39 लाख फॉलोवर्स!!; RHA म्हणजे काय??, त्या आंदोलनाचा हेतू काय??; वाचा सविस्तर!!

    CJP, E20 जनता पार्टीच्या बरोबरीने RHA चा पण उदय, तब्बल 39 लाख फॉलोवर्स!!; RHA म्हणजे काय??, त्या आंदोलनाचा हेतू काय??; वाचा सविस्तर!!

    नाशिक : कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन केवळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर यशस्वी झाल्याचे मानले गेले. त्या पाठोपाठ E20 जनता पार्टीचा सुद्धा उदय झाला. त्यातून जनतेच्या इंधन स्वातंत्र्याचा पुकारा करण्यात आला, पण त्या पलीकडे जाऊन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एका नवीन चळवळीचा उदय झाला, त्या चळवळीचे नाव RHA!!
    म्हणजेच रिझर्वेशन हटाव आंदोलन!! या आंदोलनाला सुद्धा संपूर्ण देशभरातूनच काय, पण जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. RHA म्हणजेच रिझर्वेशन हटाव आंदोलनाचे instagram पेजवर तब्बल 39 लाख फॉलोवर्स झाले.

    – कॉकरोच पाठोपाठ E20 जनता पार्टीचा उदय

    सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांना कॉकरोच म्हटले. त्याचा परिणाम कॉकरोच जनता पार्टीच्या उदयास झाला. मग भले त्यात देशविरोधी घटक शिरले, तरी त्या पार्टीला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन यशस्वी झाल्याचे मानले गेले. त्यामुळे E20 जनता पार्टीचा उदय झाला. पेट्रोलमध्ये इथेनॉल 20% मिसळण्याला त्या पार्टीने विरोध केला. देशात इंधन स्वातंत्र्याचा पुकारा केला. देशभरातल्या सगळ्या पेट्रोल पंपांवर इथेनॉल मिश्रित पेट्रोल विकण्याबरोबरच शुद्ध पेट्रोल विका. जनतेचे इंधन स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका. आमच्या गाड्यांना इंधनाची प्रयोगशाळा बनवू नका अशा घोषणा ई20 जनता पार्टीने लिहिल्या. त्यांना सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

    – RHA चा उदय

    या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणखी एक पार्टी उदयाला आली किंबहुना आंदोलन उदयाला आले त्याचेच नाव
    RHA म्हणजे रिझर्वेशन हटाव आंदोलन. या आंदोलनाला instagram पेजवर तब्बल 39 लाख फॉलोवर्स मिळाले. रिझर्वेशन हटाव आंदोलनाने “सारी जाति एकसमान, मेरा बस ये देश महान” हे आंदोलनाचे ब्रीदवाक्य ठरविले. या आंदोलनाचा कोणीही संस्थापक नाही, पण तरीही या आंदोलनाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान प्रतिसाद मिळाला. रिझर्वेशन हटाव आंदोलनाने शिका, आंदोलन करा आणि संघटित राहा!!, हा संदेश सगळ्यांना दिला.

    – RHA चा संदेश

    – आरक्षण नको; सगळ्यांना समान संधी द्या!!,

    – गुणवत्तेकडे दुर्लक्ष करू नका!!

    – आरक्षणाच्या नावाखाली जातीवादालाची चिथावणी देऊ नका!!

    – आर्थिक दुर्बलांकडे दुर्लक्ष करू नका!!

    – गुणवत्तेला प्राधान्य द्या!! मेरीट हमारा हक है, कोटा नाही!!,

    आरक्षण हटाव आंदोलनाने या विविध घोषणा दिल्या. या सगळ्या घोषणांना देशभरातून आणि परदेशातून सुद्धा तुफान प्रतिसाद लाभला.

    RHA stands for the ‘Reservation Hatao Andolan’ (Movement to Abolish Reservation).

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Jayant Patil : धर्मेंद्र प्रधानांच्या नेतृत्वाखाली मराठा इतिहासाशी छेडछाड; हा राजीनामा मराठ्यांचा इतिहास पुसणाऱ्यांना धडा, जयंत पाटलांची टीका

    E20 janata party : मोदींना हरवू आणि हलवू शकत नाही म्हणून त्यांच्या विश्वासू मंत्र्यांवर हल्लाबोल!!

    PM Modi : मोदी म्हणाले– पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा आणणार; परीक्षा सुधारणांसाठी हायपॉवर टास्क फोर्स स्थापन, इन्फोसिसचे नीलेकणी होणार अध्यक्ष